रॅडिको अपघात : तिघांचा अटकपूर्व जामीन रद्द

आवडल्यास ही बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर : येथून जवळच असलेल्या रॅडिको उद्योगातील दुर्घटना प्रकरणी सहायक व्यवस्थापक (सुरक्षा) सुरेंद्र खैरनार, सहायक व्यवस्थापक (देखभाल दुरुस्ती) महादेव पाटील आणि ठेकेदार ज्ञानेश्वर रिठे यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने रद्द केला आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघेही सध्या पसार आहेत.

रॅडिको कंपनीत मका साठवणुकीची महाकाय टाकी (गव्हाण) फुटल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी दोन व्यवस्थापक आणि ठेकेदार अशा तिघांविरुद्ध करमाड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुरेशी साधनसामग्री न देता धोक्याच्या ठिकाणी त्यांना काम करायला भाग पाडले, म्हणून त्यांच्याविरुद्ध करमाड पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील तिनही आरोपींचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने शनिवारी (दि. ३०) रद्द केला आहे.
रॅडिको डिस्टिलरी कंपनीत साडेतीन हजार टन मका असलेली भलीमोठी टाकी (सायलो) फुटल्याने मक्याच्या ढिगाऱ्याखाली दबून दत्तात्रय बोढरे, किसन हिरडे, संतोष पोपळघट आणि विजय गवळी या चार कामगारांचा दबून मृत्यू झाला होता. या प्रकरणातील वरील तीन आरोपींचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने रद्द केला. सरकारी अभियोक्ता सूर्यवंशी यांनी सरकारच्या वतीने काम पाहिले. प्रभारी अधिकारी सपोनि. प्रताप नवघरे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर, कोर्ट पैरवी पोहे. जाधव करीत अधिक तपास आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »