राजा रवि वर्मा

आज मंगळवार, एप्रिल २९, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर वैशाख दिनांक ९ , शके १९४७
सूर्योदय : ०६:१२ सूर्यास्त : १९:००
चंद्रोदय : ०७:०८ चंद्रास्त : २०:५७
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : द्वितीया – १७:३१ पर्यंत
नक्षत्र : कृत्तिका – १८:४७ पर्यंत
योग : सौभाग्य – १५:५४ पर्यंत
करण : बालव – ०७:१९ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – १७:३१ पर्यंत
क्षय करण : तैतिल – ०३:४८, एप्रिल ३० पर्यंत
सूर्य राशि : मेष
चंद्र राशि : वृषभ
राहुकाल : १५:४८ ते १७:२४
गुलिक काल : १२:३६ ते १४:१२
यमगण्ड : ०९:२४ ते ११:००
अभिजित मुहूर्त : १२:१० ते १३:०२
दुर्मुहूर्त : ०८:४५ ते ०९:३७
दुर्मुहूर्त : २३:२९ ते ००:१३, एप्रिल ३०
अमृत काल : १६:४० ते १८:०४
वर्ज्य : ०८:१२ ते ०९:३७
अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः । इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।
अर्थः चार वेद मुखोद्गत आहेत (संपूर्ण ज्ञान) आणि पाठीवर बाणासह धनुष्य आहे (शौर्य) – म्हणजेच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही असल्याने शाप अणि शस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जो जाणतो [तो परशुराम
परशुराम हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात. त्यांचा जन्म जमदग्नी व रेणुकामाता यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला (अक्षय्य तृतीयेला) झाला.
परशुरामाच्या अवतार कार्य संपल्याचे कोणत्याही ग्रंथात उल्लेख आला नसल्याने परशुराम हे सात चिरंजीवांमधील एक आहेत असे समजले जाते.
‘भगवान परशुराम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा’
दरवर्षी २९ एप्रिल हा दिवस आंतराराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन-जॉर्जेस नोव्हेर (इ.स.१७२७-१८१०) यांचा हा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस पाळला जावा असे आंतरराष्ट्रीय नाट्यसंस्था(इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूशन-ITI) ने ठरवले. ही संस्था युनेस्कोची भागीदार असलेली स्वतंत्र संस्था आहे. तिच्या आदेशावरून इ.स. १९८२ सालापासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. या दिवशी, जगप्रसिद्ध आणि त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट नृत्य कलावंला जागतिक संदेश देण्यासाठी आमंत्रित केले जाते.
नृत्य कलेला आणि नृत्य कलावंताला जगमान्यता मिळावी, या कलेचा उत्कर्ष आणि अधिकाधिक प्रसार व्हावा आणि तिला राजाश्रय मिळावा हा उद्देश, आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा करण्यामागे आहे.
आज आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस आहे.
राजा रवि वर्मा हेभारताच्या त्रावणकोरच्या राजघराण्यातील एक चित्रकार होते त्यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची रंगीत चित्रे काढली. राज रविर्वमाने काढलेल्या चित्रांनंतरच हिंदूंना आपले देव कसे दिसत असावॆत, ते समजले. भारतातील परंपरागत हिंदू महाकाव्ये आणि पुराणांतील कथा यांवर रविवर्म्यानॆ काढलेली चित्रे आजही प्रमाण मानली जातात.
रवींचा जन्म एका राजघराण्यात २९ एप्रिल १८४८ रोजी केरळमधील कोईल तंपुरन येतील किलिमनूर राजवाड्यात झाला. तयांचे वडील मोठे विद्वान व आई ही कवयित्री होती. तयांच्या आईने लिहिलेले काव्य, ‘पार्वती स्वयंवर’ हे रविवर्म्याने तिच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध केले. राजा रवि वर्माला सी.गोडा वर्मा नावाचा भाऊ व मंगला नावाची बहीण होती.त्याच्या बालपणीच त्याला महाराज अलियम् तिरुनल या त्याच्या नातलग राजाचा आश्रय मिळाला. रविवर्म्याचे काका उत्तम चित्रकार होते. तो वारसा पुतण्यात उतरला. याशिवाय त्रिवेंद्रमच्या राजदरबारी असणारे इंग्रज चित्रकार थी ओडेर जेन्सन, रामस्वामी नायडू यांच्या चित्रकारितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्रावणकोर महाराजांच्य प्रोत्साहनामुळे त्याला अधिकच प्रेरणा मिळाली.
१८७३ मध्ये मद्रास येथील चित्रकलेच्या स्पर्धेत रविवर्म्याने सुवर्णपदक मिळवले.
महाराजांच्या दरबारात असणाऱ्या इटालियन तैलचित्रांकडे पाहून त्याने तैलचित्रे काढण्याचे ठरवले.
राजा रविवर्म्याच्या चित्रांत एक सुंदर, प्रमाणबद्ध व सौंदर्यवती साडी नेसलेली स्त्री असते. त्याचा स्टुडिओ महाराष्ट्रात लोणावळ्याला होता. तेव्हा दिसलेल्या मराठी स्त्रियांकडे पाहून त्याने तशाच स्त्रिया चित्रांत रंगवल्या. सन इ.स. १८७३ मध्ये, व्हिएन्ना येथे झलेल्या कला प्रदर्शनात त्याला मिळालेल्या प्रथम पारितोषिकामुळे ते जागतिक क्षेत्रावर प्रकाशझोतात आले.
१८४८: चित्रकार राजा रवि वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर , १९०६)
- घटना :
१९३३: प्रभात कंपनीचा सिंहगड हा चित्रपट प्रदर्शित झाला.
१९४५: दुसरे महायुद्ध इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.
१९८६: लॉस एंजेल्स सेंट्रल लायब्ररीतील आग लागल्यामुळे सुमारे ४,००,००० पुस्तक नष्ट झाले.
१९९१: बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यातील भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,०००लोकांचा बळी घेतला तर सुमारे कोटी लोक बेघर झाले.
• मृत्यू :
१९६०: पद्म भूषण पुरस्कार सन्मानित हिन्दी कवी पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ नवीन यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८९७)
• १९८०: लेखक, विचारवंत आणि समीक्षक श्रीकृष्ण के. क्षीरसागर यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर, १९०१)
- जन्म :
१९४६ : स्वतंत्र छत्तीसगड राज्याची निर्मिती झाल्यानंतर १ ले मुख्यमंत्रीपद भूषविणारे अजित जोगी यांचा जन्म . ( मृत्यू : २९ मे , २०२० )
१८६७: भारताचे एडिसन डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल, १९३५)
१८९१: भारतीय कवी आणि कार्यकर्ते भारतीदासन यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल , १९६४)
१९३६: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय संगीतकार झुबिन मेहता यांचा जन्म.