‘राजाराम’ निवडणूक : २१ जागांकरिता ४४ उमेदवार रिंगणात
कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या २१ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही गटांत सरळ दुरंगी लढत होणार आहे.
‘राजाराम’च्या निवडणुकीसाठी एकूण १५० अर्ज दाखल झाले होते. पंधरा दिवसांच्या मुदतीत एकूण १०६ जणांनी माघार घेतली. हातकणंगले, करवीर, पन्हाळा ,राधानगरी, शाहूवाडी आणि गगनबावडा अशा सात तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेल्या राजाराम कारखान्याचे १३ हजार ५३८ सभासद आहेत. त्यामध्ये १२९ ”ब” वर्ग सभासदांचा समावेश आहे.
गट क्रमांक पाच व अनुसूचित जाती जमाती गटवगळता सर्व गटांत दुरंगी लढत होणार आहे. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी 23 एप्रिलला मतदान तर 27 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला आहे.
दोन्ही पॅनेलने आपल्या उमेदवारांची घोषणा केल्यामुळे प्रचाराला आता अधिकच रंगत येणार आहे. सत्तारूढ गटाचे नेते माजी आमदार अमल महाडिक व विरोधी गटाचे नेते माजी आमदार सतेज पाटील यांनी निवडणुकीसाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार यंत्रणा अधिकच सक्रिय केली आहे.
राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीने आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली २१ पैकी १६ नव्या चेहऱ्यांना संधी देत आपले पॅनेल जाहीर केले. या पॅनेलची घोषणा करताना ‘आमचं ठरलंय..कंडका पाडायचा, उसाला दर मिळवायचा’ हा घोषवाक्य वापरले आहे.
उच्च न्यायालयाने परिवर्तन पॅनेलचे २९ उमदेवार अवैध ठरवले आहेत. त्यामुळे विरोधी गटाने प्लॅन बीचा वापर करत आपले उमदेवार रिंगणात उतरवले आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी परिवर्तन पॅनेलमध्ये किरण भोसले, शिवाजी किबिले, बाबासाहेब देशमुख, अण्णा रामण्णा यांना संधी दिली होती. या निवडणुकीतही त्यांना संधी मिळाली आहे. दरम्यान, आमदार सतेज पाटील यांनी नवीन चेहऱ्यांना संधी देत कारखान्यात बदल घडवायचाच, असा नारा लगावला आहे.
गट क्रमांक चार या करवीर तालुक्यातील वाशीसह अन्य १३ गावांचा समावेश असलेल्या गटात विरोधी परिवर्तन आघाडीकडून वाशी या एकाच गावातील तीन उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. याउलट सत्तारूढ गटाने या गटात येणाऱ्या अन्य दोन गावांत प्रतिनिधीत्त्व देण्याचा प्रयत्न केला आहे. या गटात एकूण २६४९ मतदार आहेत, यापैकी ४३३ मतदार एकट्या वाशी गावांत आहेत.
…
विरोधी आघाडीचे उमदेवार
- व्यक्ती उत्पादक सभासद
गट क्रमांक १ : शालन बाबूराव बेनाडे (रुई, ता. हातकणंगले) व किरण बाबासाहेब भोसले (रुकडी, ता. हातकणंगले). - गट क्रमांक २ : शिवाजी ज्ञानू किबिले (कुंभोज, ता. हातकणंगले), अभिजित सर्जेराव माने (भेंडवडे, ता. हातकणंगले) व दिलीप गणपतराव पाटील (टोप, ता. हातकणंगले).
- गट क्रमांक ३ : विलास शंकर पाटील (भुये, ता. करवीर), विठ्ठल हिंदुराव माने (वडणगे, ता. करवीर) व बळवंत रामचंद्र गायकवाड (आळवे, ता. पन्हाळा).
- गट क्रमांक ४ : दिनकर भिवा पाटील (वाशी, ता. करवीर), सुरेश भिवा पाटील (वाशी, ता. करवीर) व संभाजी शंकरराव पाटील (वाशी, ता करवीर).
- गट क्रमांक ५ : विजयमाला विश्वास नेजदार-माने (कसबा बावडा, ता. करवीर) व मोहन रामचंद्र सालपे (कसबा बावडा)
-गट क्रमांक ६ : दगडू मारुती चौगले (धामोड, ता. राधानगरी) व शांताराम पांडुरंग पाटील ( सावर्धन, राधानगरी) - महिला राखीव प्रतिनिधी : पुतळाबाई मारुती मगदूम (कांडगाव, ता. करवीर) व निर्मला जयंतव पाटील (निगवे दुमाला, ता. करवीर)
-अनुसूचित जाती-जमाती : बाबासाहेब थळोजी देशमुख (शिरोली पुलाची, ता. हातकणंगले)
-इतर मागास प्रतिनिधी : मानसिंग दत्तू खोत (नरेंद, ता. हातकणंगले) - भटक्या विमुक्त जाती : अण्णा विठू रामाण्णा (पट्टण कोडोली, ता. हातकणंगले)
-संस्था गट प्रतिनिधी : सचिन नरसगोंडा पाटील (वसगडे, ता. करवीर)
………………………..
सत्तारूढ गटाचे उमेदवार
सत्तारूढ छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये
- उत्पादक गट क्रमांक १ मधून 1) विजय वसंत भोसले, 2) संजय बाळगोंडा मगदूम
- उत्पादक गट क्रमांक २ मधून 1) शिवाजी रामा पाटील, 2) सर्जेराव बाबुराव भंडारे, 3) अमल महादेवराव महाडिक,
- उत्पादक गट क्रमांक ३ मधून 1) विलास यशवंत जाधव, 2) डॉ.मारुती भाऊसो किडगावकर, 3) सर्जेराव कृष्णात पाटील (बोणे)
- उत्पादक गट क्रमांक ४ मधून 1) तानाजी कृष्णात पाटील, 2) दिलीपराव भगवान पाटील, 3)मीनाक्षी भास्कर पाटील
- उत्पादक गट क्रमांक ५ मधून 1)दिलीप यशवंत उलपे, 2)नारायण बाळकृष्ण चव्हाण, उत्पादक गट क्रमांक ६ मधून 1) गोविंद दादू चौगले, 2) विश्वास सदाशिव बिडकर,
- महिला राखीव गटातून 1) कल्पना भगवानराव पाटील, 2)वैष्णवी राजेश नाईक
- इतर मागास प्रतिनिधी गटातून 1)संतोष बाबुराव पाटील, अनुसूचित जाती जमाती गटातून 1) नंदकुमार बाबुराव भोपळे, भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून 1) सुरेश देवाप्पा तानगे, संस्था गटातून 1) महादेवराव रामचंद्र महाडिक यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी उमेदवारांची नावे घोषित करताच उपस्थित समर्थकांनी जल्लोष केला.
यावेळी बोलताना माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. गेली अठ्ठावीस वर्षे कारखाना ज्या विश्वासाने सभासदांनी आमच्या हाती सोपवला, त्याच विश्वासाने यंदाही कारखान्याचे सुज्ञ सभासद आम्हाला सेवेची संधी देतील. विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी राजाराम कारखाना त्यांना बळकावता येणार नाही. असे उद्गार महाडिक यांनी काढले.
सत्तारूढ सहकार आघाडीचे नेते अमल महाडिक यांनी बोलताना सर्वसमावेशक उमेदवारांचे तगडे पॅनेल आम्ही जाहीर केले असून, विजयाच्या दिशेने आम्ही पहिले पाऊल टाकल्याचे सांगितले. सर्वसामान्य शेतकरी सभासद आमच्या पॅनेलला भरघोस मतांनी विजयी करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. खासदार धनंजय महाडिक यांनी माघार घेतलेल्या उमेदवारांचे आभार मानले तसेच सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
सत्तारूढ गटाने वगळलेले विद्यमान
■ वसंत बेनाडे (रुई), आनंदा तोडकर (पट्टणकडोली), सिद्ध नरबळ (नरंदे), प्रशांत तेलवेकर (वडणगे), पंडित पाटील (गडमुडशिंगी), हरिष चौगले (बावडा), राजाराम मोरे (सोन्याची शिरोली), कुंडलिक चरापले (धामोड), कल्पना पाटील (वाशी), कल्पना किडगावकर (निगवे दुमाला), इतर मागासवर्ग- पांडुरंग पाटील (बाजार भोगाव), भटक्या-विमुक्त जाती-जमाती – बिरदेव खानगे (कुंभोज).