साखर कारखान्यांच्या डिजिटायझेशनचा *विश्वगुरू*


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकार अध्यासन व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय परिषद साखर उद्योगाच्या उत्कर्षासाठी अर्थकारणाची दिशा या विषयावर नुकतीच बोलण्याची संधी मिळाली.
हा माझ्यासाठी केवळ सन्मान नव्हता, तर हृदयाला स्पर्श करणारा क्षण होता. संत ज्ञानेश्वर सभागृहात उभं राहून, एआय आणि आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साखर उद्योगाच्या वाढीसाठी आपण काय करू शकतो यावर विचार मांडताना मनात एक आगळा भावनांचा प्रवाह सुरू झाला.
क्षणभर मन बालपणीच्या निमगावच्या शेतात गेलं. उसाच्या पिकात राबवणारे काका, चुलते आणि आजही कष्टाने जमिनीला समृद्ध करणारे भाऊ आठवले. डोळ्याच्या कडाही नकळत ओलावल्या.
ज्या सहकार चळवळीने शेतकर्यांच्या कष्टाला अर्थकारणाची दिशा दिली, ज्या उद्योगाने गावोगावी समृद्धी पोहोचवली, त्या साखर उद्योगाबद्दल बोलताना मनात एकच भावना होती – या उद्योगासाठी आणि या भूमीसाठी आता काही तरी तंत्रज्ञानाद्वारे परत द्यायचं आहे.
विश्वगुरु इन्फोटेक : शेती ते उद्योग यांना जोडणारा दुवा
विश्वगुरु इन्फोटेक या संस्थेची मुळेच शेतकरी कुटुंबांच्या अनुभवात आणि सहकाराच्या संस्कारात रुजलेली आहेत. त्यामुळे आमचं ध्येय नेहमीच स्पष्ट राहिलं आहे, ते म्हणजे शेतीपासून कारखान्यापर्यंतची प्रत्येक प्रक्रिया डिजिटल आणि पारदर्शक करणे.
या उद्देशाने आम्ही विकसित केला आहे एक अत्याधुनिक Smart Agri ERP Platform, जो शेतकरी, सहकारी संस्था आणि साखर कारखाने या सर्वांना एका एकत्रित डिजिटल साखळीत जोडतो.
या ERP प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शक्य होईल:
- उस खरेदी व तोडणी व्यवस्थापनाचे डिजिटायझेशन
- GIS आधारित शेत नकाशे आणि उत्पादन अंदाज
- AI आधारित, वैश्विक बाजारपेठ, हवामान व सिंचन विश्लेषण
- Farm-to-Factory Traceability शेतापासून पेमेंटपर्यंतची पारदर्शक नोंद
- सहकारी व्यवस्थापन व आर्थिक एकत्रीकरण
हे तंत्रज्ञान केवळ डेटा संकलनापुरतं मर्यादित नाही; ते निर्णयक्षमतेचं नवं बळ आहे. कारखान्यांना कार्यक्षम, शेतकर्यांना आत्मनिर्भर आणि संपूर्ण साखर साखळीला भविष्याभिमुख बनवणारं!
साखर उद्योगासाठी ERP सोल्यूशन : सहकाराचा नवा अध्याय
महाराष्ट्राचा साखर उद्योग हे केवळ आर्थिक क्षेत्र नाही, तर तो ग्रामीण जीवनाचा आत्मा, सामाजिक प्रगतीचं प्रतीक आणि स्वावलंबनाचा पाया आहे. पण बदलत्या हवामान, खर्च आणि बाजारपेठांच्या आव्हानांमुळे या क्षेत्राला आता डेटा-आधारित व्यवस्थापनाची गरज आहे.
याच पार्श्वभूमीवर विश्वगुरु इन्फोटेकने विकसित केले आहे Sugar Industry ERP Suite, ज्यामध्ये पुढील प्रमुख मॉड्यूल्स आहेत:
- Supply Chain Digitization: उस तोडणीपासून वाहतूक आणि साठ्यापर्यंत थेट ट्रॅकिंग
- Finance Payment Automation: सहकारी बँका, शेतकरी आणि कारखाने यांचं थेट डिजिटल जोडणी
- Real-time Management Dashboard: : उत्पादन, पेमेंट, साठा व खर्चाचे एकत्रित विश्लेषण
- Regulatory Compliance Tools: PFMS, GST, MIS आणि शासन अहवालांची स्वयंचलित पूर्तता
या ERP च्या माध्यमातून साखर उद्योग अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि टिकाऊ बनण्याचं स्वप्न आम्ही पाहतोय आणि ते साकार करण्यासाठी आम्ही पूर्णतः कटिबद्ध आहोत.
भावनिक नातं आणि डिजिटल जबाबदारी
सहकार क्षेत्रातील अधिकारी आणि मान्यवरांशी आमचे स्नेहाचे संबंध आहेतच. आमचे काका आनंदराव गांगर्डे पाटील हे जगदंबा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन होते. पुढे, पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे वरिष्ठ संचालक आणि आमचे मित्र श्रीधर गायकवाड यांच्या माध्यमातून, सहकारमहर्षी, पुणे जिल्हा बँक असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते यांच्या प्रेरणेने माझी बोर्ड ऑफ मॅनेजमेंटमध्ये नेमणूक झाली. या माध्यमातून मला सहकारी बँक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांसोबत कार्य करण्याची संधी मिळाली.
तत्कालीन चेअरमन श्री. रणदिवे आणि सहकारातील ऋषितुल्य, सहृदयी व्यक्तिमत्त्व बबनराव भेगडे यांच्या सहवासात काम करताना मी औपचारिकरित्या सहकाराशी जोडला गेलो.
त्या दिवशी विद्यापीठाच्या पवित्र प्रांगणात, रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड, रवींद्र शिंगणापूरकर, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बोलताना मनात कृतज्ञतेची भावना होती.
एका शेतकरी कुटुंबातील मुलगा म्हणून, सहकार क्षेत्राला विश्वगुरु इन्फोटेकच्या माध्यमातून डिजिटल बळ देणं ही माझ्यासाठी केवळ व्यावसायिक जबाबदारी नाही, तर ती भावनिक जबाबदारी आहे.
संत ज्ञानेश्वर सभागृहातून बाहेर पडताना विद्यापीठाचं गीत पुन्हा ओठांवर आलं.
पुण्यमयी दे आम्हां अक्षर वरदान,
ज्ञान बनो कर्मशील, कर्म ज्ञानवान
कदाचित विद्यापीठाच्या शिक्षण संस्काराचा भाग असेल, त्या विद्यापीठ गीताच्या ओळी नकळत आमच्या कामाचं सूत्र बनल्या आहेत. मातीतील ज्ञान आणि तंत्रज्ञानाचं भान, या दोन्हींचा संगम म्हणजेच नव्या सहकार युगाची सुरुवात.
(लेखक राजेंद्र गांगर्डे पाटील हे विश्वगुरू इन्फोटेकचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)






