राजगड कारखान्याला NCDC कडून ४६8 कोटींचे कर्ज मिळणार

मुंबई : माजी आमदार संग्राम थोपटे अध्यक्ष असलेल्या अनंतनगर निगडे (ता. भोर) येथील राजगड सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या मार्जिन मनी कर्जास राज्य शासनाने मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ‘राजगड‘ला ‘एनसीडीसी‘कडून ४६७कोटी ८५ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध होणार आहे.
राजगड कारखान्याबरोबर भोर आणि राजगड तालुक्यातील सहकार क्षेत्राला सुगीचे दिवस येणार आहेत. सद्यःस्थितीत बंद असलेला राजगड कारखाना नव्या रूपाने उभा राहणार असून, साखर निर्मितीसोबत इतर तीनप्रकल्प उभे राहणार आहेत. यामध्ये राजगड कारखान्याच्या प्रतिदिन ३ हजार ५०० टन गाळपाचा नवीन प्रकल्प, ६० एलपीडी क्षमतेचा नवीन डिस्टीलरी प्रकल्प (मद्यनिर्मिती प्रकल्प), १२ मेगावॅट वीजनिर्मितीचा प्रकल्प आणि ५ टन सीएनजी गॅस निर्मिती प्रकल्पाचा समावेश आहे.
राजगडकारखान्यावर कोट्यवधींचे कर्ज असून, कारखान्यातील मशिनरी जुनी झालेली आहे. कर्मचाऱ्यांचे पगारही थकले आहेत. त्यामुळे कारखाना बंद झाला. माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळेच हा अचानक धनलाभ झाला असल्याची चर्चा आहे.