राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा

आज सोमवार, जानेवारी १२, २०२६ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष २२, शके १९४७
सूर्योदय : ०७:१४ सूर्यास्त : १८:१९
चंद्रोदय : ०२:३२, जानेवारी १३ चंद्रास्त : १३:०९
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर : विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : हेमंत
चंद्र माह : पौष
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : नवमी – १२:४२ पर्यंत
नक्षत्र : स्वाती – २१:०५ पर्यंत
योग : धृति – १८:१२ पर्यंत
करण : गर – १२:४२ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – ०१:५९, जानेवारी १३ पर्यंत
सूर्य राशि : धनु
चंद्र राशि : तूळ
राहुकाल : ०८:३८ ते १०:०१
गुलिक काल : १४:१० ते १५:३३
यमगण्ड : ११:२४ ते १२:४७
अभिजित मुहूर्त : १२:२५ ते १३:०९
दुर्मुहूर्त : १३:०९ ते १३:५३
दुर्मुहूर्त : १५:२२ ते १६:०६
अमृत काल : ११:१४ ते १३:०१
वर्ज्य : ०३:२३, जानेवारी १३ ते ०५:११, जानेवारी १३
आज राष्ट्रीय युवक दिन आहे.
जिजाऊ ही एक स्त्री होती….
स्वराज घडविणाऱ्या स्पुर्तीची ति एक मूर्ती होती…
शहाजी राजेंचे ती एक विर पत्नी होती ….
जाधव घराण्याची ति एक लाडकी लेक होती …
भोसले घराण्याची ति एक आदर्श सून होती….
आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी ति एक महान माता होती…
स्त्री शक्ती चे प्रतिक असनाऱ्या त्या एक स्त्री उद्धारक माता होत्या…
जगातील प्रतेक स्त्री यांनी ज्यांचा आदर्श घ्यावा…
अशा त्या आदर्श माता होत्या …
अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा…
आज राष्ट्रमाता राजमाता जिजामाता जंयती आहे.
- स्वामी विवेकानंद –
धर्म हा भारतीय जीवनाचा मूलाधार आहे आणि विज्ञानयुगात होरपळणाऱ्या साऱ्या जगाला भारतातील अध्यात्मविचारामुळे शांती लाभणार आहे, अशी स्वामी विवेकानंद यांची श्रद्धा होती. त्यांनी भारताला स्वतःच्या अस्मितेची जाणीव उत्पन्न करून दिली आणि पाश्चात्य
त्यांनी जगाला भारताचा परिचय करून दिला. धर्माबरोबरच शिक्षण, राजकारण, समाजकारण, स्त्रियांची उन्नती, जनसामान्यांचा विकास अशा अनेक विषयांवर त्यांनी मूलगामी विचार व्यक्त केले आहेत. जगामध्ये यानंतर श्रमिकांच्या सत्तेचा उदय होणार आहे, हे भविष्यदर्शी उद्गार त्यांनी १८९८ मध्ये काढले.
दरिद्रनारायण हा त्यांचा शब्द आहे. त्यांनी त्यागाला सेवेची जोड दिली आणि भारतात आजवर चालत आलेल्या संन्यासाच्या संकल्पनेत मूलभूत क्रांती केली. भारतातील अध्यात्म आणि पाश्चात्यांचे आधुनिक विज्ञान यांच्या समन्वयातून उद्याची आदर्श मानवसंस्कृती उदयाला येणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
बुद्धी व श्रद्धा, विचार आणि भावना, सामर्थ्य आणि करुणा, ऐहिक व आध्यात्मिक यांचा विवेकानंदांइतका उत्कृष्ट समन्वय दुसऱ्या कोणीही घातलेला नाही. भारताच्या आधुनिक युगाशी मेळ घालणारा व भविष्यातील समन्वयशील मानवसंस्कृतीची दिशा दाखवणारा असा श्रेष्ठ महापुरुष दुसरा दाखविता येत नाही.
१८६३: भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे नरेन्द्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै , १९०२)
१९३३ : क्रांतिकारक प्रद्योत कुमार भट्टाचार्य या तरुण क्रांतिकारकाला वयाच्या १९ व्या वर्षी फाशी दिली गेली. ( जन्म :३ नोव्हेंबर, १९१३ )
- घटना :
१७०५: सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.
१९१५: महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.
१९३१: सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी देण्यात आली.
१९३६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा.
१९९७: सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला बाया कर्वे पुरस्कार प्रदान.
२००५: राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना.
२००६: हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३६२ यात्रेकरुंचा मृत्यू.
• मृत्यू :
• १९४४: लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्वस्त वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी यांचे निधन. (जन्म: २८ एप्रिल १८५४)
• १९६६: स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी , १८९६)
• १९९२: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९२४)
• २००५: ज्येष्ठ हिंदी चित्रपट कलावंत अमरीश पुरी यांचे निधन. (जन्म: २२ जून , १९३२ – लाहोर, पंजाब, पाकिस्तान)
जन्म :
१८५४: विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑगस्ट १९३०)
१९०२: महर्षी न्यायरत्न धोंडीराजशास्त्री विनोद यांचा जन्म. (मृत्यू: १३ जुलै १९६९)
१९०६: भारतीय संस्कुतीकोशाचे संपादक महादेवशास्त्री जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर, १९९२)
१९१७: महर्षी महेश योगी यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी,२००८)
१९१८: ज्येष्ठ संगीतकार सी. रामचंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी , १९८२)
१९३७ : विद्या बाळ – या मराठी लेखिका व संपादक होत्या. त्यांनी १९५८ साली पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. (अर्थशास्त्र) ही पदवी घेतली. महाराष्ट्रामधील व भारतामधील स्त्रियांच्या पुरुषांबरोबरच्या समान हक्कांविषयीच्या सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता (मृत्यू: ३० जानेवारी, २०२०)





