महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाची ११ वी परिषद १८ फेब्रुवारीला

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोलापूर : महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ व मासिक ऊस संदेश आयोजित राज्यस्तरीय ” ११ वी ऊस परिषद” रविवार दिनांक १८/०२/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता माढ्यातील (जि. सोलापूर) माहेश्वरी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष अतुलनाना माने-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ऊस शेतीतील जाणकार आणि ऊस शेतीशी पुरक उद्योजकांनी एकत्रित येवून सध्याच्या बिकट परिस्थितीवर योग्य चर्चा करून, त्याचे कारण शोधून त्याच्यावर ठोस उपाययोजना सुचविण्याची गरज निर्माण झाली असून, त्यासाठीच महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाने या ऊस विकास परिषदेचे आयोजन केलेले आहे.

ऊस परिषदेत आधुनिक ऊस पीक तंत्रज्ञान विषयाचे मार्गदर्शन करण्यात येणार असून श्री. कृष्णात पाटील सांगाव राज्य तज्ञ संचालक ऊस संघ, हे खोडवा व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, तसेच शामकांत पाटील (जैन एरिगेशन लि) हे ऊस पीक व ठिबक सिंचन व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वरील ऊस परिषदेस उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संघाचे संस्थापक अध्यक्ष अतुलनाना माने पाटील यांनी केले. यावेळी पत्रकार परिषदेसाठी किरणभाऊ चव्हाण, समीर शेख, मदन मुंगळे, मुकुंद आरे इ. उपस्थित होते.

पुरस्कारांचीही घोषणा
या निमित्ताने ” ऊस भूषण कार्य गौरव पुरस्कार – २०२३ “चे वितरणही यावेळी होणार आहे.
पुरस्कारप्राप्त व्यक्तींची यादी १) श्री. प्रतिक चंद्रकांत झिने रा. बाभुळगाव, ता. बाशी, जि. सोलापूर, २) श्री. बाळासो श्रीरंग पवार रा. वडोली निळेश्वर, ता. कराड, जि. सातारा, ३) श्री. सुरेश नानासाो शेंडे रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा, ४) श्री. भारत रंगराव तावरे रा. सांगवी, ता. बारामती, जि. पुणे, ५) श्री. लक्ष्मणराव आप्पासो सुळ रा. मोरोची, ता. माळशिरस, जि. सोलापूर ६) श्री. प्रविण प्रकाश येवले-पाटील रा. कसबा पेठ, टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूर, ७) श्री. विजय दिनकर बोरचाटे रा. दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर, ८) श्री. ओंकार लक्ष्मण भोसले रा. साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा, ९) श्री. सचिन भानुदास जगताप रा. बेंबळे, ता. माढा, जि. सोलापूर, १०) डॉ. सुप्रिया निलेश बोबडे रा. माळेगाव (बु.), ता. बारामती, जि. पुणे, ११) श्री. दत्तात्रय भानुदास शेरकर रा. रस्तापूर, ता. नेवासा, जि. अहमदनगर, १२) श्री. मच्छिद्र कृष्णा देशमुख रा. टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूर, १३) श्री. ज्ञानदेव तुकाराम गुरव रा. नवे खेड, ता. वाळवा, जि. सांगली, १४) श्री. संभाजी व्यंकु पाटील रा. सांगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर, १५) श्री. सागर प्रकाश रणदिवे रा. तुंगत, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, १६) श्री. सुजित लक्ष्मण परबत रा. मानेगाव, ता. माढा, जि. सोलापूर १७) श्री. युवराज खासेराव देसाई रा. कवठे पिरान, ता. मिरज, जि. सांगली

तसेच १) श्री. नितीन ज्ञानदेव भुजबळ रा. वरकुटे (बु), ता. इंदापूर, जि. पुणे, २) श्री. धनाजी उत्तरेश्वर ढवळे रा. मु. माळेगाव, पो. टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूर, ३) श्री. सुभाष चिंतामणी पाटील रा. दुडजे, ता. चंदगढ, जि. कोल्हापूर यांना सन २०२३ चा ऊस विकास कार्य गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »