आज रामनवमी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज रविवार, एप्रिल ६, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र १६, शके १९४७
सूर्योदय : ०६:२८ सूर्यास्त : १८:५४
चंद्रोदय : १३:२४ चंद्रास्त : ०२:५९, एप्रिल ०७
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : चैत्र
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : नवमी – १९:२२ पर्यंत
नक्षत्र : पुष्य – ०६:२५, एप्रिल ०७ पर्यंत
योग : सुकर्मा – १८:५५ पर्यंत
करण : बालव – ०७:१९ पर्यंत
द्वितीय करण : कौलव – १९:२३ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : कर्क
राहुकाल : १७:२० ते १८:५४
गुलिक काल : १५:४७ ते १७:२०
यमगण्ड : १२:४१ ते १४:१४
अभिजितमुहूर्त : १२:१६ ते १३:०६
दुर्मुहूर्त : १७:१४ ते १८:०४
अमृत काल : २३:४६ ते ०१:२६, एप्रिल ०७
वर्ज्य : १३:४९ ते १५:२९

श्री राम चंद्र कृपालू भजमन हरण भाव भय दारुणम्।
नवकंज लोचन कंज मुखकर, कंज पद कन्जारुणम्।।
कंदर्प अगणित अमित छवी नव नील नीरज सुन्दरम्।
पट्पीत मानहु तडित रूचि शुचि नौमी जनक सुतावरम्।।
भजु दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदनम्।
रघुनंद आनंद कंद कौशल चंद दशरथ नन्दनम्।।
सिर मुकुट कुण्डल तिलक चारु उदारू अंग विभूषणं।
आजानु भुज शर चाप धर संग्राम जित खर-धूषणं।।
इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मन रंजनम्।
मम ह्रदय कुंज निवास कुरु कामादी खल दल गंजनम्।।

हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र यांची जन्म तिथी. प्रभू श्रीराम हे वाल्मीकिंनी रचलेल्या ’रामायण’या महाकाव्याचे नायक आहेत. श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार आहेत.
श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या असे रामायणातील उल्लेखांंवरून दिसून येते. म्हणूनच त्यांना भारतीय जनमानसात‘मर्यादापुरुषोत्तम’ म्हटले जाते.

पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे (आत्मारामाचे) राज्य असणे, हे खरे रामराज्य होय, असे संतांचे सांगणे असते..

आज रामनवमी आहे.

१६०८ : आज श्री समर्थ रामदास जयंती आहे.( नारायण सूर्याजीपंत ठोसर ) चैत्र शु. ९, शके १५३० (२४ मार्च १६०८) निर्वाण : माघ कृ. ९, शके १६०३ (१३ जानेवारी १६८१).

धर्मभास्कर विनायक महाराज मसूरकर हे धार्मिक आणि सांस्कृतिक चळवळींचे स्रोत होते. मसुरकर महाराजांनी ‘मसुराश्रम’ या आश्रमाची स्थापना १९२० साली गोरेगाव पूर्व, मुंबई येथे केली. त्यांनी समर्थ संप्रदायाचा प्रसार केला. स्वातंत्र्यपूर्व काळात बलवान स्वातंत्र्य सैनिक तयार करण्यासाठी सूर्यनमस्काराची उपासना व दासबोधाचे वाचन ही मसूरकर महाराजांनी महाराष्ट्रभर सुरू केलेली मोहीम होती.

मसुरकर महाराज यांना भेटण्यासाठी सुभाषबाबू सन १९३१ साली कराड येथील मसुराश्रमाच्या शिबिरात आले होते. रत्नागिरी येथे १९३१ साली पतितपावन मंदिराची स्थापना झाली. त्या वेळी स्वामी मसुरकरमहाराजांची व संतश्रेष्ठ गाडगेमहाराजांची भेट झाली.

मसुराश्रम येथे गुजरात व गोवा येथील ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित झालेल्या हिंदूंना पुन्हा स्वधर्मात आणण्याचे मोठे कार्य केले व करत आहे. त्याचप्रमाणे सूर्यनमस्कार व बलोपासनेचाही त्यांनी पुरस्कार केला. शुद्धी चळवळीला एक दिशा देण्याचे काम केलेले मसुराश्रमाचे ब्रह्मचारी विश्वनाथजी, वामनमूर्ती व इतर अनेकांनी केले.

युखॅरिस्ट कॉंग्रेस, वादग्रस्त फादर फेरार प्रकरण, केरळमधील नन्सच्या विक्रीचे स्कॅंडल, भिवंडीची व जळगावची दंगल, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलेले भारताचे विभाजन प्रयत्न, आंध्रच्या किनारपट्टीवर मिशनऱ्यांनी ‘ख्रिस्तस्थान’ तयार करण्याची केलेली रचना या विरोधात आश्रमाने कार्य केले आहे.
हिंदू नववर्षाचा पहिला दिवस घेऊन येणारा गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी त्यांनी जनजागृती केली. स्वागतयात्रा, शोभायात्रा आणि भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. या मध्ये पारंपरिक ध्वजपथक, लेझीम, मानवी मनोरे, तलवारबाजी, मंगळागौर असे देखावे उभारण्यात मसुराश्रम अग्रणी आहे.

१९५५: धर्मभास्कर विनायक महाराजा मसूरकर यांचे निधन.

उद्योजक विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग – वाई गावातील द्रविड हायस्कूल मध्ये प्राथमिक शिक्षण झाल्यावर ते पुढील शिक्षणासाठी पुण्याला आले. १९४९ साली ते पुणे इंजिनिअरिंग कॉलेज मधून सिव्हिल इजिनिअरिंगची परीक्षा पास झाले. त्यांनी सुरुवातीला मध्य प्रांतात व नंतर मुंबई इलाख्यात नोकरी केली, पण त्यांचे चित्त नोकरीत लागले नाही.

नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी १९५२ साली किरकोळ भांडवलावर स्वत:ची स्थापत्य कंपनी उभारली.

दादासाहेब जोग यांची कंपनी ही मुळात इंजिनिअरिंग व्यवसायातली. रस्ते बांधणी, उड्डाण पूल, मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे यामध्ये त्यांनी मोठे नाव कमावले आहे. आजही त्यांची कंपनी देशात आणि परदेशात जलविद्युत प्रकल्पांसाठी लागणारी बांधकामे करीत आहेत. दादासाहेब जोग यांच्या कंपनीने रायगड किल्ल्यावर जावयाचा रोप-वे बांधला आहे. या रोपवेचे उद्घाटन ३ एप्रिल १९९६ रोजी झाले. छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगडला भेट देणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांसाठी रोप-वे हे महत्वाचे आकर्षण ठरले आहे. रोप-वे बरोबरच तिथे आता निवासाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

१९२७: उद्योजक विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग यांचा जन्म. (मृत्यू: २८ जून , २०००)

घटना :
१६५६: शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.
१८९६: आधुनिक ऑलिम्पिक खेळांची ग्रीसमधील अथेन्स येथे सुरूवात झाली. ग्रीक सम्राट थेडोसियस (पहिला) याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.
१९१७: पहिले महायुद्ध – अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९३०: प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
१९६५: व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला अर्ली बर्ड हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला
१९६६: भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली.
१९८०: भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले.
१९९८: भारतापर्यंत सहज पोहोचू शकणार्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.
१९९८: स्तनांचा कर्करोग बरा करणार्या टॅमॉक्सीफेन या औषधाच्या चाचणीचे निकाल जाहीर करण्यात आले. या औषधामुळे होणार्या दुष्परिणामांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढते, असे जाहीर करण्यात आले.
२०००: मीर या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले सोयूझ हे अंतराळयान मीर ला भेटले.

मृत्यू :
१९८१: मानवधर्माचे उपासक शंकर धोंडो तथा मामा क्षीरसागर यांचे निधन. . ( जन्म: २३ सप्टेंबर, १९०३ )
१९८३: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, जनरल जयंतोनाथ चौधरी यांचे निधन. (जन्म: १० जून १९०८)
१९८९: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा – कादंबरीकार पन्नालाल पटेल यांचे निधन. (जन्म: ७ मे १९१२ )

जन्म :
१८९०: उर्दू कवी व शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १९६०)
१९०९: भावगीतगायक व संगीतकार जी. एन. जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९९४)
१९१७: पद्मश्री पुरस्कार सन्मानित मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर, २००६)
१९१९: कोंकणी कवी रघुनाथ विष्णू पंडित यांचा जन्म.
१९३१: बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेत्री रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१४ )
१९३४ : अग्रलेखांचे बादशहा म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक नवाकाळचे संपादक नीळकंठ खाडिलकर यांचं जन्म ( मृत्यू : २२ नोव्हेंबर २०१९ )
१९५९ : जेष्ठ मराठी साहित्यिक, सुप्रसिद्ध गीतकार, प्रतिभावंत प्राध्यापक प्रवीण दवणे यांचा जन्म
१९५६: क्रिकेटपटू व प्रबंधक दिलीप वेंगसरकर यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »