रामशास्त्री प्रभुणे, आजचे पंचांग

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज मंगळवार, ऑक्टोबर १५, २०२४ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर अश्विन २३ शके १९४६
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:३३ सूर्यास्त : १८:१५
चंद्रोदय : १६:४६ चंद्रास्त : ०५:०७, ऑक्टोबर १६
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
दक्षिणायन
ऋतु : शरद
चंद्र माह : आश्विन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : त्रयोदशी – ००:१९, ऑक्टोबर १६ पर्यंत
नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा – २२:०८ पर्यंत
योग : वृद्धि – १४:१४ पर्यंत
करण : कौलव – १४:०३ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – ००:१९, ऑक्टोबर १६ पर्यंत
सूर्य राशि : कन्या
चंद्र राशि : कुंभ – १६:४९ पर्यंत
राहुकाल : १५:२० ते १६:४८
गुलिक काल : १२:२४ ते १३:५२
यमगण्ड : ०९:२८ ते १०:५६
अभिजितमुहूर्त : १२:०१ ते १२:४७
दुर्मुहूर्त : ०८:५३ ते ०९:४०
दुर्मुहूर्त : २३:१० ते २४:००
अमृत काल : १५:०० ते १६:२६

अंधांच्या पुनर्वसनासाठी रोजगार आवश्यक आहे.
ज्या व्यक्तींना जन्मत:च आणि जन्मानंतर अंधत्व आले आहे, अशा व्यक्तींना सकारात्मकरीत्या प्रकाशाची वाट दाखविण्याचे काम नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड (नॅब) ही संस्था गेल्या २५ वर्षांंपासून कार्यरत आहे. जवळपास ७०० कोटींची उलाढाल असलेल्या नॅब संस्थेला आज अनेक दानशूर व्यक्ती आर्थिक सहाय्य करीत आहेत.

१५ ऑक्टोबर हा जागतिक पांढरी काठी दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो.

जागतिक विद्यार्थी दिवस हा भारताचे माजी राष्ट्रपती आणि विख्यात अंतराळ शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस भारतासह सर्व जगात पाळला जातो.

आज आंतरराष्ट्रीय जागतिक विद्यार्थी दिन आहे.

   👏🏾 ‘स्वच्छ हात धुवा’ 🙌🏾
   👏🏾 ‘रोगांना दूर ठेवा’  🙌🏾

🏡आपल्या सभोवतालच्या परिसरात हानीकारक किटाणू असतात आणि हे किटाणू➖

🐛अस्वच्छ हाताला स्पर्श केल्यास
🐛दुषित पाणी किवा अन्नातून
🐛खोकल्यातून किंवा शिंकेतून बाहेर येणाऱ्या हवेद्वारे
🐛आजारी व्यक्तीच्या शरीर द्रव्याच्या संपर्कात आल्यास…..
👉🏾शरीरात प्रवेश करतात आणि यातूनच पुढे मेंदू, फुफ्फुस्, यकृताचे दुर्धर आजार जडतात, त्यामुळे हात धुणे किती महत्वाचे आहे हे लक्षात येते.
👀 परंतु 👀
😷या रोगांपासून बचाव करण्यासाठी एक रामबाण उपाय आहे तो म्हणजे “स्वच्छ हात धुणे”

आज जागतिक हातधुणे दिन आहे.

१९३१: वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २०१५)

‘न्यायाधिशांची जागा विभूषित करणारा पहिला गृहस्थ म्हणजे रामशास्त्री !’ – पाश्चिमात्य इतिहासकार ग्रँड डक

१७८९: उत्तर पेशवाईतील प्रसिद्ध न्यायाधीश रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे यांचे निधन.

साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला- बालपण बंगालमध्ये गेल्यामुळे मातृभाषा बंगाली – पण मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने ते हिंदी भाषा शिकले आणि तीत साहित्यनिर्मितीही करू लागले. वृत्तीने ते बंडखोर आणि विचाराने क्रांतिवादी होते. आर्थिक संघर्षाबरोबरच साहित्यिक मान्यतेसाठीही त्यांना संघर्षच करावा लागला. जीवनभर कराव्या लागलेल्या संघर्षाचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर व परिणामतः काव्यावर झालेला आहे.

उत्तरायुष्यात मानसिक तोल ढासळल्यामुळे त्यांच्या वृत्तीत विक्षिप्तपणा आला. काव्याशिवाय त्यांनी कथा, कादंबऱ्या आणि निबंधही लिहिले. समन्वय, मतवाला, सुधा इ. नियतकालिकांचे संपादनही त्यांनी काही काळ केले. एकूण ४४ ग्रंथ त्यांच्या नावावर आढळतात.
मुख्यतः कवी म्हणूनच हिंदीत त्यांचे नाव चिरंतन झाले आहे.

१९२३ साली मतवाला या मासिकात त्यांची ‘जुही की कली’ ही विमुक्त प्रणयाचे मादक शब्दचित्र रेखाटणारी कविता प्रसिद्ध झाली. ही कविता सरस्वतीचे संपादक महावीरप्रसाद द्विवेदी यांनी साभार परत केली होती. ते नवे नवे प्रयोग करणारे साहसी कवी होते. हिंदीमध्ये मुक्तछंदात कविता लिहिण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. छंदांच्या बंधनांना झुगारून भावानुकूल शब्द व लय यांचा पुरस्कार करण्याचे ऐतिहासिक कार्य करणाऱ्यांमध्ये निरालांचाच वाटा महत्त्वाचा आहे. मुक्तछंदातील त्यांच्या कांव्यात आशयानुकूल अंतर्गत लय विशेषत्वाने जाणवते. त्यांच्या अभिव्यक्तीवर बंगाली आणि इंग्रजी भाषांतील काव्याचा प्रभाव दिसतो.

निरालांचे एकूण काव्य वैविध्यपूर्ण आहे. शृंगार, कारूण्य, वात्सल्य, हास्य, उपरोध यांनी ते संपन्न आहे. राम की शक्तिपूजासारख्या त्यांच्या दीर्घकाव्यात पौरुष व ओज यांचा प्रत्यय येतो. तुलसीदास ही चिंतनपर, अंतर्मुख वृत्तीची दीर्घकविता त्यांच्या निसर्गप्रेमाची, सांस्कृतिक पुनरुज्जीवनाच्या तळमळीची आणि रचनाकौशल्याची साक्ष देते.

तुलसीदासांना महाकाव्य लिहिण्याची प्रेरणा का व कशी मिळाली, याचा शोध घेण्याचा या कवितेत त्यांनी प्रयत्न केला आहे. याच संदर्भात तत्कालीन सामाजिक परिस्थितिचेही काव्यात्म वर्णन आले आहे. त्यांनी आपल्या कन्येच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या ‘सरोजस्मृति’ या शोकगीताची हिंदीतील सर्वश्रेष्ठ विलापिकांत गणना केली जाते.

निसर्गप्रेम, सौंदर्याची आसक्ती, उत्तुंग कल्पनाशक्ती, चोखंदळ शब्दयोजना, सूक्ष्मता, वैयक्तिकता ही सर्व छायावादी वैशिष्ट्ये तर निरालांच्या काव्यात आढळतातच पण त्यांचे खास वैशिष्ट्य हे, की, ते काळाबरोबर गतिशील राहिले छायावादाच्या हळव्या व भावविवश विश्वातून कठोर वास्तवाच्या खडबडीत भूमीवर ठामपणे उभे राहिले. ‘भिक्षुक’, ‘वह तोडती पत्थर’, ‘बनबेला’, ‘कुकुरमुत्ता’ यांसारख्या सामाजिक आशयाच्या कविता त्यांनी लिहिल्या.
• १९६१: हिन्दी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचे निधन. (जन्म: २१ फेब्रुवारी १८९६)

घटना :

  • १८७८: एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनीचे काम सुरू झाले.
    १८८८: गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरूवात केली.
    १९१७: पहिले महायुद्ध – जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच नर्तिका माता हारी हिला पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात आला.
    १९३२: टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले. जे. आर. डी. टाटा यांनी हे विमान कराचीहुन मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली. याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयीकरण होऊन एअर इंडिया ही कंपनी अस्तित्त्वात आली.
    १९६८: हरगोविंद खुराणा यांना नोबेल पारितोषिक प्रदान.
    १९७३: हेन्री किसिंजर आणि ली डक यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.
    १९७५: बांगलादेशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा शेवटचा रुग्ण ठरली.
    १९९३: अफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. क्लर्क यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर.

• मृत्यू :

• १९४४: ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक गुरुनाथ प्रभाकर ओगले यांचे निधन.
• १९९७: मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक दत्ता गोर्ले यांचे निधन.
• २००२: प्रसिद्ध एेतिहासिक कादंबरीकार ना. सं. इनामदार यांचे निधन. (जन्म:२३ नोव्हेंबर, १९२३ )
• २००२: लेखक व पटकथाकार वसंत सबनीस यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १९२३)

  • जन्म

१८९६: स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती सेठ गोविंद दास यांचा जन्म. ( मृत्यू : १८जून, १९७४ )
१९२६: कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट २०१०)
१९३४: कर्नाटिक शैलीचे बासरीवादक एन. रामाणी यांचा जन्म. ( मृत्यू : १६ ऑगस्ट, २०१० )
१९४६: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक व्हिक्टर बॅनर्जी यांचा जन्म.
१९४९: पत्रकार, एन. डी. टी. व्ही. चे संस्थापक प्रणोय रॉय यांचा जन्म.
१९५७: भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शिका मीरा नायर यांचा जन्म.
१९६९: मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर यांचा जन्म.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »