उसाचा फडात हळदी-कुंकू कार्यक्रम

रावळगांव साखर कारखान्याचा स्तुत्य उपक्रम
नाशिक : स्पायका ग्रीन एनर्जी & ॲग्रो प्रा . लि. संचालित रावळगांव साखर कारखान्यातर्फे ऊसतोड महिला भगिनींसमवेत हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम थेट फडात जाऊन करण्यात आला. ऊसतोड महिला भगिनींना हळदी-कुंकू, तिळगूळासोबत साडी भेट देण्यात आली. त्यामुळे ऊसतोडणी महिलांना खूप आनंद झाला.
यावेळी कारखान्याचे चेअरमन श्री बबनराव सोपानराव गायकवाड यांनी मनोगतामध्ये मागील वर्षी कारखाना स्थळी महिला भगिनींच्या हस्ते साखरपुजन करून हळदी कुंकू कार्यक्रम केला होता. यावर्षी फडात जाऊन करू असे आमच्या महिला भगिनींनी ठरवले होते व त्याप्रमाणे चार वेगवेगळ्या फडात जाऊन हळदी कुंकूवाचा कार्यक्रम करण्यात आला. रावळगांव साखर कारखाना कायम ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड व वाहतुकदार कर्मचारी बांधवांबरोबर राहिला आहे व तो यापुढेही कायम राहील व पुढील वर्षी यावर्षी पेक्षा जास्त ऊस गाळप करून बायप्रोडक्ट सुरू करू, अशी घोषणाही त्यांनी केली.
टोळीच्या प्रमुख सौ. आक्काताई श्रावण मालचे यांनी कारखान्याचे व्यवहार चांगले आहेत हे पाहून आम्हीं तुमच्याकडे काम करण्यास आलो आहोत. येथुन पुढे कायम रावळगांव कारखान्याबरोबर काम करू, असे आश्वासन दिले.

यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, तसेच सौ. वंदना बबनराव गायकवाड, सौ सुनीता अरूण गुरगुळे , सौ. सुनीता आसाराम भटे , सौ. वंदना कुंदन चव्हाण, संचालक अरूण गुरगुळे, संचालक सीताराम फुलसुंदर, उन्मय चव्हाण, शेतकीचे मार्गदर्शक आण्णासाहेब भामरे , शेतकीप्रमुख शिवाजी देसाई, भिकन नेरकर, सोनु गोंधळे, श्री विकी कुंटे, शेतकी कर्मचारी बांधवांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.