ऊसतोड मजुरांच्या खोपटांवर दरोडा; १२ मोबाईल लंपास

करवीर : कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील निगवे खालसा येथे चोरट्यांनी ऊसतोड मजुरांना लक्ष करत एकाच रात्रीत १२ मोबाईल चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.शनिवारी (दि. २०) मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या २-३ चोरट्यांनी मजुरांच्या खोपटात घुसून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल लांबविला. एका मजुराला चाकूचा धाक दाखवून धमकावण्यात आले.
सचिन पाटील, आनंदा कापसे, प्रदीप कापसे, प्रदीप पाटील आणि के. टी. पाटील यांच्या टोळीतील मजुरांचे हे मोबाईल चोरीला गेले आहेत. दिवसभर कष्ट करून गाढ झोपेत असलेल्या मजुरांच्या उशाचे मोबाईल चोरट्यांनी पळवले असून, या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.






