कामगार झाले संचालक अन्‌ पुत्र चेअरमन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत त्याच कारखान्यात कामगार असलेले विक्रमकाका घायाळ संचालकपदी निवडून आले, तर त्यांचे सुपुत्र आणि पॅनलप्रमुख सचिन घायाळ (सीए) चेअरमन बनले आहेत. या आनंदी योगायोगाची अख्या साखर क्षेत्रात चर्चा सुरू आहे.

२२ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या चेअरमनपदाच्या निवडणुकीत सर्वानुमते सचिन घायाळ यांची, तर व्हाइस चेअरमनपदी प्रल्हाद औटे यांची निवड करण्यात आली.
कारखान्याला कर्जाच्या खाईतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच, कारखाना परिसरात भव्य कृषी केंद्र, शेतकरी भाजीपाला खरेदी केंद्र उभारणार असल्याचे नंतर घायाळ यांनी सांगितले.
गुरुवारी दुपारी १२ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांच्या उपस्थितीत झालेल्या निवडणुकीत चेअरमन, व्हाइस चेअरमन पदासाठी दोनच अर्ज आल्यामुळे अनुक्रमे सचिन घायाळ व औटे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली,
यावेळी कारखान्याचे संचालक तुषार सिसोदे, अक्षय सिसोदे, आबासाहेब मोरे, विक्रम घायाळ, शिवाजी जाधव, एकनाथ नवले, भाऊसाहेब पिसे, दत्ता वाकडे, कचरु बोबडे, ताराबाई घायाळ, रमेश झिने, अनुराधा तुपकरी, उषा थोरात, बाबासाहेब खरात, दत्तात्रय आम्ले, दीपक फांदाडे, दिगंबर गोर्डे, भरत घायाळ आदी उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »