‘एकनाथ कारखाना’ निवडणुकीत घायाळ, शिसोदे पॅनेलचा दणदणीत विजय

आवडल्यास ही बातमी शेअर करा

शेतकरी विकास पॅनलचे १५ उमेदवार विजयी :
माजी आ. वाघचौरे यांच्या पॅनलचा सुपडा साफ


छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कारखाना भाडेतत्त्वावर चालविणारे (सी.ए) सचिन घायाळ आणि चेअरमन तुषार सिसोदे यांचा दणदणीत विजय झाला.

त्यांच्या संत एकनाथ शेतकरी विकास पॅनलचे सर्व १५ उमेदवार विजय झाले. यापूर्वी सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे यांचे चिरंजीव विशाल वाघचौरे यांच्यासह नऊ उमेदवाराचा दारुण पराभव झाला.

श्रीसंत एकनाथ सहकारी साखर कारखाना २१ संचालकाच्या निवडणुकीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. सहा जागा बिनविरोध आल्याने, रविवारी १५ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. मतमोजणी सोमवार रोजी पैठण शहरातील एका मंगल कार्यालयात झाली
सी.ए सचिन घायाळ, चेअरमन तुषार सिसोदे यांच्या पॅनलचे १५ उमेदवार दणदणीत विजय मिळविला असून यामध्ये कावसान गट क्र.१ मिळालेले एकूण मतदान सी. ए सचिन घायाळ ४९२२, एकनाथ नवले ४७८९, आबासाहेब मोरे ४६६९. विहामांडवा गट क्र. २ प्रल्हाद औटे ४९०९, भाऊसाहेब पिसे ४८५२, दत्ता वाकडे ४६३६, लोहगाव गट क्र. ५ तुषार शिसोदे ४८३१, अक्षय शिसोदे ४९०३, कचरू बोबडे ४८९४,

सहकार पणन संस्था ताराबाई घायाळ ४८, अनुसूचित जाती रमेश झिने ४८७०, महिला मतदार संघ अनुराधा तुपकर ४६५८, उशाबाई थोरात ४५६४, ओबीसी मतदार संघ – शिवाजी जाधव ४८५८, विमुक्त जाती- बाबासाहेब खरात ४९४४ हे मताधिक्याने विजयी झाले आहे

यापूर्वी पाचोड गटातून विक्रम काका घायाळ, भारत घायाळ, गणेश घायाळ, बिडकीन गटातून दिगंबर तात्या गोर्डे, दीपक फंदाडे, दत्तात्रय आम्ले हे ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शेतकरी विकास पॅनलच्या समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी करून नाथ मंदिरापर्यंत विजय मिरवणूक काढली. यावेळी नवनिर्वाचित संचालकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले.

पालकमंत्री अलिप्त
श्रीसंत एकनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये स्लीपबाय ते चेअरमन या पदापर्यंत पोहोचलेले जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी या कारखान्याच्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आपला पॅनल व उमेदवार उभे न केल्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत सी.ए सचिन घायाळ, चेअरमन तुषार सिसोदे यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेल्या पॅनल एकतर्फी निवडून येण्याची वाट मोकळी झाली.
भुमरे, घायाळ, सिसोदे यांच्यात निवडणूक दरम्यान काय राजकीय समझोता झाला, हे समजू शकलेले नाही. पालकमंत्रीच निवडणुकीपासून दूर राहिल्याची चर्चा मात्र रंगली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »