शेखर गायकवाड यांना मातृशोक
पुणे : सेवानिवृत्त साखर आयुक्त आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई नारायणराव गायकवाड यांचे बुधवारी (१५ मे) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर १५ मे रोजी दुपारी चार वाजता शिरूर (जि. पुणे) येथील अमरधाम स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
कै. लक्ष्मीबाई यांच्या पश्चात पुत्र दिलीप गायकवाड, दीपक गायकवाड, शेखर गायकवाड आणि कन्या सौ. जयश्री बोरूडे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने कै. लक्ष्मीबाई गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली.