साहेबराव खामकर लिखित *गोष्ट साखरेची* पुस्तकाचे सहकार भारतीच्या वतीने प्रकाशन

पुणे : सहकार भारती , महाराष्ट्र प्रदेशचे साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुख साहेबराव खामकर लिखित साखरेची गोष्ट या पुस्तकाचे प्रकाशन
प्रदेश कार्यकारिणीचे लोणावळा येथील बैठकी मध्ये येथे रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे व राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांचे हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविकामध्ये सहकार भारती , महाराष्ट्र प्रदेशचे महामंत्री विवेक जुगादे यांनी या पुस्तका बद्दल माहिती देऊन हे पुस्तक अभ्यासपूर्वक लिहिले असून सर्वांनाच फायदेशीर असल्याचे सांगितले.
या वेळी बोलतांना सर्व सहकारी संस्था या व्यावसायिक पध्दतीने व प्रामाणिकपणाने चालविल्या पाहिजेत , असे मत अनासकर यांनी व्यक्त केले.
रिझर्व बॅंकेचे संचालक सतीश मराठे यांनी त्रिभुवन सहकार विद्यापीठामुळे सहकार क्षेत्राला कुशल व पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होईल, असे सांगितले व विद्यापीठात चालविण्यात येणा-या विविध कोर्सेसची माहिती दिली.
या प्रसंगी बोलतांना पुस्तकाचे लेखक साहेबराव खामकर म्हणाले की , महाराष्ट्र राज्याच्या कृषि व औद्योगिक विकासात साखर उद्योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक प्रगती मध्ये साखर उद्योगाचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. साखर ही प्रत्येकाच्या दैनंदिन संबंधातील वस्तू आहे. परंतु या साखरेचा जन्म कसा झाला, त्यासाठी लागणा-या कच्च्या मालाची म्हणजे ऊसाची उत्पत्ती कशी व कधी झाली. साखर उत्पादन करणारे कारखाने केंव्हा निर्माण झाले व त्या मध्ये कालानुरूप कसे बदल झाले इ. सह राष्ट्रीय सहकार धोरण , इथेनॉल धोरण , एफ.आर.पी., एआय तंत्रज्ञान आदी विषयांचा देखील पुस्तकामध्ये थोडक्यात ऊहापोह केला आहे.
यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी यांचे हस्ते खामकर यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष दत्ताराम चाळके , संघटन प्रमुख शरद जाधव तसेच सहकार भारतीचे प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.पुणे विभाग प्रमुख गिरीश भवाळकर यांनी आभार मानले.





