कुशल प्रशासक : वाढदिवस शुभेच्छा
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक आणि साखर उद्योग क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे तज्ज्ञ श्री. संजय खताळ यांचा २० सप्टेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ मासिकाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
श्री. खताळ यांची प्रशासकीय कारकीर्द देखील देदीप्यमान आहे. महाबीज, महानंद अशा सस्थांचा कार्यभार त्यांनी यशस्वीपणे सांभाळलेला आहे. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी साखर संघाची जबाबदारी स्वीकारली आणि आजतागायत ते साखर क्षेत्रासाठी झोकून देऊन काम करत आहेत.
जलसिंचन खात्यात कनिष्ठ अभियंता म्हणून १९८२ मध्ये त्यांची प्रशासकीय कारकीर्द सुरू झाली. नंतर त्यांनी एमएआयडीसीचे उप सरव्यवस्थापक म्हणून सुमारे दोन दशके सेवा बजावली. सिंबायोसिस या नामवंत आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी सहा. प्राध्यापक म्हणून तीन वर्षे अध्यापनाचे काम केले. २००८ मध्ये त्यांनी महाबीजचे विपणन सरव्यवस्थापक आणि २०१३ मध्ये वाणिज्यिक सरव्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळत भरीव योगदान दिले.
विविध पुरस्कारांनी गौरवान्वित, अत्यंत उत्साही, तंत्रकुशल असलेले श्री. खताळ, व्यवस्थापन, मार्केटिंगचेही तज्ज्ञ असून, स्पष्टवक्ते म्हणून सर्वांना परिचित आहेत. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा!