साखर निर्यात : निर्णयासाठी काही महिने लागतील – अन्न सचिव
न्यूयॉर्क : साखर निर्यातीस परवानगी द्यायची की नाही या निर्णय होण्यासाठी आणखी काही महिने लागतील, असे केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण सचिव संजीव चोप्रा यांनी म्हटले आहे.
ब्राझीलनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा साखर उत्पादक असलेल्या भारताने जून 2022 पासून साखर निर्यातीवर बंदी घातली आहे.
न्यूयॉर्कमधील सिटी आयएसओ डेटाग्रो शुगर कॉन्फरन्सच्या वेळी सचिव संजीव चोप्रा पत्रकारांशी बोलत होते..
ते म्हणाले की, स्थानिक मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशी साखर आणि किमान अडीच महिन्यांचा साठा आणि इथेनॉल कार्यक्रमाकडे वळवण्यासाठी पुरेसा साखर साठा असेल याची स्पष्टता झाल्याखेरीज साखर निर्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता नाही. साखर निर्यात पुन्हा सुरू करण्यापेक्षा सरकारने इथेनॉल उत्पादनाला प्राधान्य दिले आहे.
दरम्यान, भारतातील साखर उद्योग संस्था ISMA ने अलीकडेच सरकारला 2 दशलक्ष मेट्रिक टन निर्यातीला परवानगी देण्याची मागणी केली होती. याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही, असे ‘इस्मा’चे महासंचालक दीपक बल्लानी यावेळी म्हणाले.
बल्लानी म्हणाले की, इथेनॉल उत्पादनाकडे वळवल्यानंतर सप्टेंबरमध्ये चालू हंगामाच्या अखेरीस भारताकडे 9 दशलक्ष टन साखर असेल – स्थानिक वापर आणि निर्यातीसाठी हा पुरेसा साठा आह, असे आम्हाला वाटते.