संत गाडगे महाराज

आज रविवार, फेब्रुवारी २३, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन ४ , शके १९४६
सूर्योदय : ०७:०२ सूर्यास्त : १८:४२
चंद्रोदय : ०४:०१, फेब्रुवारी २४ चंद्रास्त : १४:०४
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : दशमी – १३:५५ पर्यंत
नक्षत्र : मूळ – १८:४२ पर्यंत
योग : वज्र – ११:१९ पर्यंत
करण : विष्टि – १३:५५ पर्यंत
द्वितीय करण : बव – ०१:५६, फेब्रुवारी २४ पर्यंत
सूर्य राशि : कुंभ
चंद्र राशि : धनु
राहुकाल : १७:१४ ते १८:४२
गुलिक काल : १५:४७ ते १७:१४
यमगण्ड : १२:५२ ते १४:१९
अभिजित मुहूर्त : १२:२९ ते १३:१५
दुर्मुहूर्त : १७:०९ ते १७:५५
अमृत काल : १२:०२ ते १३:४२
वर्ज्य : १७:०२ ते १८:४२
वर्ज्य : ०४:२५, फेब्रुवारी २४ ते ०६:०२, फेब्रुवारी २४
“तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |”
असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. “देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका.” अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत.
१८७६: देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९५६)
अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव ऊर्फ निर्मला देवी – निर्मला श्रीवास्तव यांचा जन्म एका ख्रिश्चन कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रसादराव साळवे आणि आईचे नाव कार्नेलिया होते. वडील प्रसादराव साळवे यांना १४ भाषा अवगत होत्या.
निर्मला श्रीवास्तव यांचे वैद्यकीय शिक्षण लुधियाना येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आणि लाहोर येथील बाळकराम मेडिकल कॉलेज येथे झाले होते.
या सहजयोग ध्यान साधनातंत्राच्या आणि एका नव्या धार्मिक व आध्यात्मिक चळवळीच्या संस्थापक होत्या. त्यांचे अनुयायी त्यांना माताजी या नावाने संबोधत. त्यांचा जन्म साक्षात्कारी अवस्थेतच झाला असल्याची श्रद्धा आहे.
‘सहजयोग या ध्यानसाधनेद्वारे लोकांनी आपला आत्मसाक्षात्कार साधावा, यासाठी आणि सह्जायोगाद्वारे जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी निर्मला देवी यांनी आपले सारे आयुष्य व्यतीत केले. सहजयोग शिकवण्यासाठी त्यांनी कोणतेही शुल्क घेतले नाही. १४० देशांत त्यांनी निःशुल्क सेवा दिली. निर्मला देवी यांनी चले जाव चळवळीत तुरुंगवास भोगला होता. गांधीजी त्यांना प्रेमाने नेपाली या नावाने हाक मारीत.
निर्मला श्रीवास्तव यांनी ‘सहजयोग’ कार्याचा आरंभ ०५ मे १९७० रोजी वयाच्या ४७ व्या वर्षी केला. त्यांचे पती सर चंद्रिकाप्रसाद श्रीवास्तव हे लंडन येथे युनायटेड नेशन्स मेरीटाईम ऑर्गनायझेशनचे सहसचिव असताना तेथे एका छोट्या गटात निर्मला श्रीवास्तव यांनी ‘सहजयोगातून शांतता’प्रसाराचे काम सु्रू केले.
निर्मला देवी यांनी सहजयोगाच्या माध्यमातून अनेक बिगरसरकारी सामाजिक संस्था उभ्या केल्या. त्यांच्या कार्याची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली.
२०११: सहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव यांचे निधन. (जन्म: २१ मार्च१९२३)
- घटना :
१४५५: पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक गटेनबर्ग बायबल प्रकाशित झाले.
१७३९: चिमाजी अप्पाच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंड्यावर हल्ला चढवला.
१९४१: डॉ. ग्लेन सीबोर्ग यांनी प्लूटोनिअम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे केले.
१९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फोर्झेम शहर बेचिराख केले.
१९४७: आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना.
१९५२: संसदेने कामगार भविष्य निर्वाह निधी विधेयक मंजूर केले.
१९९६ कोकण रेल्वेच्या चिपळूण – खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ झाला.
१९९७: रशियाच्या मीर या अंतराळस्थानकामधे आग लागली.
• मृत्यू :
• १९६९: चित्रपट अभिनेत्री मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी१९३३ – नवी दिल्ली)
• १९९८: क्रिकेटपटू रमण लांबा यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९६०)
• २०००: वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे यांचे निधन.
• २००४: केन्द्रीय परराष्ट्रमंत्री सिकंदर बख्त यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १९१८)
• २००४: हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक विजय आनंद यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १९३४)
२०११: सहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव यांचे निधन. (जन्म: २१ मार्च१९२३)
- जन्म :
• १९१३: जादूगार प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९७१)
• १९५७: तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते येरेन नायडू यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर २०१२)
• १९६५: मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर अशोक कामटे यांचा जन्म. (मृत्यू: २६ नोव्हेंबर २००८)