संत नरहरी सोनार जयंती

आज गुरुवार, ऑगस्ट ७, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक १६, शके १९४७
सूर्योदय : ०६:१७ सूर्यास्त : १९:११
चंद्रोदय : १७:५४ चंद्रास्त : ०५:०४, ऑगस्ट ०८
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : श्रावण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : त्रयोदशी – १४:२७ पर्यंत
नक्षत्र : पूर्वाषाढा – १४:०१ पर्यंत
योग : विष्कम्भ – ०६:४३ पर्यंत
क्षय योग : प्रीति – ०५:३९, ऑगस्ट ०८ पर्यंत
करण : तैतिल – १४:२७ पर्यंत
द्वितीय करण : गर – ०२:२४, ऑगस्ट ०८ पर्यंत
सूर्य राशि : कर्क
चंद्र राशि : धनु – २०:११ पर्यंत
राहुकाल: १४:२१ ते १५:५८
गुलिक काल : ०९:३१ ते ११:०७
यमगण्ड : ०६:१७ ते ०७:५४
अभिजितमुहूर्त : १२:१८ ते १३:१०
दुर्मुहूर्त : १०:३५ ते ११:२७
दुर्मुहूर्त : १५:४५ ते १६:३६
अमृत काल : ०९:०१ ते १०:४१
वर्ज्य : २२:१० ते २३:४८
जिव्हेश्वर या देवतेचा जन्म भगवान शंकर यांच्या जिव्हेपासून (जिभेपासून) झाला आहे, अशी श्रद्धा आहे. जिव्हेश्वर हे साळी (महाराष्ट्रातील विणकर) समाजाचे कुलदैवत असते.
आद्यवस्त्र निर्माण करता म्हणून वेदमूर्ती भगवान श्री जिव्हेश्वर यांना ओळखले जाते. भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्म भगवानशिव (महादेव) यांच्या जिव्हा/जीभेतून झाला. भगवान जिव्हेश्वर अंखंड साळी समाजाचे (भारत) दैवत आहे. भगवान जिव्हेश्वर हे भगवान शंकराचे (महादेव) चे अवतार आहे. सर्व देवांनी भगवान जिव्हेश्वर यांना पृथ्वी तलावर वस्त्र (कापड) निर्माण करण्यासाठी भगवान जिव्हेश्वर यांना जन्माला घातले, त्यामुळे यांना आद्यवस्त्र निर्माण करता म्हणुन ओळखतात.
आज भगवान जिव्हेश्वर जयंती आहे.
। परधावी नाम संवत्सरे शके अकराशे पंधरा । प्रातःकाळी जन्मला नरहरी ।। श्रावण मास शुक्लपक्ष त्रयोदशी । नक्षत्र अनुराधा बुधवारी ।
संत नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला. रामचंद्र- कृष्णदास-हरिप्रसाद-मुकुंदराज-मुरारी-अच्युत आणि नरहरी नारायण अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते.
,आज संत नरहरी सोनार जयंती आहे.
रवींद्रनाथ टागोर – ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाजसुधारक होते.१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्य व संगीतात आमूलाग्र बदल घडून आला.
अतिशय लोकप्रिय कविता असलेल्या गीतांजलीचे ते कवी होते, ज्याचे वर्णन “अगदी संवेदनशील, ताजे आणि सुंदर” कविता असे केले जाते. ते १९१३ मध्ये नोबेल पारितोषिक जिंकणारे जगातील पहिले गैर-युरोपियन आणि साहित्यातील पहिले गीतकार बनले. टागोरांच्या काव्यात्मक गाण्यांकडे अध्यात्मिक आणि पारंपारिक म्हणून पाहिले गेले; तथापि, त्यांचे “सुंदर गद्य आणि जादुई कविता” बंगालबाहेर फारसे ज्ञात नाहीत.
बंगाली साहित्यावर रवीन्द्रनाथांचा एवढा प्रभाव लक्षात आहे की, बंगाली साहित्याची रवींद्रपूर्व व रवींद्रोत्तर अशी विभागणी करण्यात येते. त्यांना कधीकधी “बंगालचा बार्ड” म्हणून संबोधले जाते. तसेच ते अत्यंत प्रतिष्ठित रॉयल एशियाटिक सोसायटीचे सदस्य होते.
कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी वयाच्या ८व्या वर्षी पहिली कविता लिहिली.
वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या. १८७७ पर्यंत त्यांनी त्यांच्या खऱ्या नावाने लघुकथा आणि नाटके प्रकाशित केली. एक मानवतावादी, सार्वभौमवादी, आंतरराष्ट्रीयवादी म्हणून त्यांनी ब्रिटिश राजवटीचा विरोध केला.
शांतिनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होते. पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला.
१९१५ साली त्यांना ब्रिटिश सरकारने “सर” ही पदवी दिली. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ती सरकारला परत केली.
रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रगीतही त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन तयार झाले.
•१९४१ : भारतीय कवी, कलावंत , शिक्षण तज्ञ, पहिले नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचे निधन ( जन्म : ७ मे, १८६१ )
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद – विशेष योगदान : श्री दत्ताजी डिडोळकर यांनी नागपुर मधील विज्ञान महाविद्यालयातून एम.एससी ,(भौतिकशास्त्र पदवी) झाल्यानंतर संघ कार्य पूर्ण वेळ करण्यासाठी संघाचे प्रचारक म्हणून संघ कार्यात स्वतःला वाहून घेतले. १९४७ मध्ये संघाचे प्रचारक म्हणून कालिकत मध्ये होते. १९४८ सालच्या संघबंदीत त्यांना अटक झाली व वेलूर जेलमध्ये स्थानबद्ध होते. नंतर मात्र राज्याबाहेर निघून जाण्याचे त्यांना आदेश दिले गेले.
१९४९ मध्ये संघ प्रेरणेने सुरू झालेली विद्यार्थी संघटना म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. अ.भा. वि.प. स्थापना करणाऱ्यांपैकी एक संस्थापक सदस्य श्री दत्ताजी डिडोळकर. सन १९५४ ते १९६४ मध्ये परत संघाचे मद्रास प्रांताची प्रांत प्रचारक म्हणून जबाबदारी आली. पुढे विवेकानंद स्मारकाच्या उभारणीत श्री एकनाथ यांचे एक प्रमुख सहकारी म्हणून कार्यरत होते.
१९६४ मध्ये अ.भा. वि.प.चे अध्यक्ष त्यांनतर १९६५ ते १९७१ मध्ये विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय संघटनमंत्री म्हणून जबाबदारी होती. त्याबरोबरच विश्व हिंदू परिषदेचे पश्चिमांचल क्षेत्र संघटनमंत्री सुद्धा म्हणून कार्यरत होते. १९७४ मध्ये नागपूर विद्यापीठ सिनेट मध्ये निवडून आले. १९८९ सालच्या परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी समारोह समितीचे अखिल भारतीय सहसचिव म्हणून जबाबदारी होती.
१९२४ : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक संघ प्रचारक श्री दत्ताजी डिडोळकर यांचा जन्म . ( मृत्यू : १४ ऑक्टोबर, १९९० )
१९३६ : दोन वेळा ‘अश्डेन’ हा मानाचा पुरस्कार विजेते डॉ. आनंद कर्वे यांचा जन्म, डॉ आनंद यांना जन्मदिन शुभेच्छा.
- घटना :
१९४२ : दुसरे महायुद्ध – प्रशांत महासागरातील ग्वाडेल कॅनॉल येथे अमेरिकेन सैन्य उतरले. व दुसऱ्या महायुद्धातील भीषण लढाही खेळली गेली. या घटनेतूनच जपानच्या माघारीला सुरवात झाली.
१९४७ : मुंबई महानगर पालिकेने BEST (Bombay Electricity Supply & Transport ) कंपनी आपल्या ताब्यात घेतली.
१९४७: थोर हायरडल व त्याच्या सहकाऱ्यांनी बाल्सा लाकडापासुन तयार केलेल्या कॉन टिकी या तराफ्यातुन १०१ दिवसात पॅसिफिक महासागरात ७,००० किमी प्रवास केला.
१९८१ : १२८ वर्ष प्रकाशित असलेले द वॉशिंग्टन स्टार हे वृत्तपत्र बंद झाले.
१९९० : गल्फ युद्धासाठी अमेरिकन सैन्य सौदी अरेबियात पोहोचले
१९९१ : जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या पृथ्वी ह्या क्षेपणास्त्राची श्रीहरीकोटा येथे झालेली चाचणी यशस्वी झाली.
१९९८ : अतिरेक्यांनी दार – ए – सलाम, टांझानिया , व नैरोबी, केनिया येथील वकिलातीवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात २१२ लोक ठार झाले.
१९४२ : दुसरे महायुद्ध – प्रशांत महासागरातील ग्वाडेल कॅनॉल येथे अमेरिकेन सैन्य उतरले. व दुसऱ्या महायुद्धातील भीषण लढाही खेळली गेली. या घटनेतूनच जपानच्या माघारीला सुरवात झाली.
१९४७ : मुंबई महानगर पालिकेने BEST (Bombay Electricity Supply & Transport ) कंपनी आपल्या ताब्यात घेतली.
१९८१ : १२८ वर्ष प्रकाशित असलेले द वॉशिंग्टन स्टार हे वृत्तपत्र बंद झाले.
१९९० : गल्फ युद्धासाठी अमेरिकन सैन्य सौदी अरेबियात पोहोचले
१९९१ : जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या पृथ्वी ह्या क्षेपणास्त्राची श्रीहरीकोटा येथे झालेली चाचणी यशस्वी झाली.
१९९८ : अतिरेक्यांनी दार – ए – सलाम, टांझानिया , व नैरोबी, केनिया येथील वकिलातीवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात २१२ लोक ठार झाले.
• मृत्यू :
•१९७४ : भेंडीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका अंजनाबाई मालपेकर यांचे निधन ( जन्म : २२ एप्रिल, १८८३ )
- जन्म :
१९१२ : पद्म भूषण सन्मानित ह्रदय रोगतज्ञ केशवराव कृष्णराव दाते यांचा जन्म ( मृत्यू : २२ एप्रिल, १९८३ )
१९२५: पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण सन्मानित भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्म. ( मृत्यू : २८ सप्टेंबर, २०२३ )
१९३६: दोन वेळा अश्डन पुरस्कार विजेते डॉ. आनंद कर्वे यांचा जन्म.






