संत सेना महाराज

आज बुधवार, ऑगस्ट २०, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक ३०, शके १९४७
सूर्योदय: ०६:२१ सूर्यास्त : १९:०३
चंद्रोदय : ०४:१६, ऑगस्ट २१ चंद्रास्त : १७:०५
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : वर्षा
चंद्र माह : श्रावण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : द्वादशी – १३:५८ पर्यंत
नक्षत्र : पुनर्वसु – ००:२७, ऑगस्ट २१ पर्यंत
योग : सिद्धि – १८:१३ पर्यंत
करण : तैतिल – १३:५८ पर्यंत
द्वितीय करण : गर – ०१:१८, ऑगस्ट २१ पर्यंत
सूर्य राशि : सिंह
चंद्र राशि : मिथुन – १८:३५ पर्यंत
राहुकाल : १२:४२ ते १४:१७
गुलिक काल : ११:०६ ते १२:४२
यमगण्ड : ०७:५६ ते ०९:३१
अभिजित मुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:१६ ते १३:०७
अमृत काल : २२:०७ ते २३:४०
वर्ज्य : १२:४७ ते १४:२०
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।।
विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।।
उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।।
भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।।
चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।
सेना महाराज हे एक वारकरी संप्रदायातील संत असून त्यांना ज्ञानदेव-नामदेवांच्या परिवारातील मानले जाते.
मध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा. घरात बादशाहाची हजामत करण्याचा मान. शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना सेना महाराजांचे मन मात्र देवपूजेत रमलेले.
अशी एक गोष्ट सांगतात की, एकदा बादशाहाने त्यांना हजामतीला बोलावले. तर सेना महाराज पूजेत रममाण झालेले. तेव्हा बादशाहा चिडला आणि त्याने सेना महाराजांना पकडण्याचे आदेश दिले. तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने बादशाहाची हजामत केली आणि सेना महाराजांना वाचविले. देव आणि भक्त यातील नाते अधोरेखित करण्यासाठी मांडलेल्या या कथेतील भावार्थ समजून घ्यायला हवा.
आज संत सेना महाराज पुण्यतिथी आहे
स्वरूप-लहरी, सबाह्याभ्यंतरी |
सर्व विश्वांतरी, व्यापुनिया ||१||
पावसी मानसी, अणुरेणुयासी |
झंकार नित्यासी, सोऽहं सोऽहं ||२||
नेक सोऽहं भावे, एकरूप व्हावे |
स्वरूपी त्या जावे, विश्रांतीसी ||३||
ज्ञानियाची भक्ति, ज्ञानियाची युक्ति |
कृष्णदास चित्ती, ठसलीसे ||४||
आज स्वामीस्वरूपानंद ,पावस पुण्यतिथी आहे (तिथी प्रमाणे )
श्री राघवेंद्र स्वामी हे हिंदू धर्मातील मध्व संप्रदायातील एक महान संत आणि तत्त्वज्ञानी होते. १६२४ ते १६३६ या कालावधीमध्ये तमिळनाडूतील कुंभकोणम् येथील श्री मठाचे ते मुख्याधीश होते. द्वैत तत्त्वज्ञानातील ‘न्याय सुधा’ ह्या श्री मध्वाचार्य लिखित ग्रंथावर त्यांनी ‘सुधा परिमल’ हा टीकात्मक संवाद लिहिला. श्री राघवेंद्र स्वामी हे भगवान विष्णूचे भक्त प्रल्हाद यांचे अवतार मानले जातात. आंध्र प्रदेशातील मंत्रालयम् येथील त्यांची समाधी भाविकांसाठी एक तीर्थक्षेत्र आहे.
श्री राघवेंद्र तीर्थ स्वामी महाराज यांनी एकूण 23 ग्रंथांची रचना केली. श्री राघवेंद्र स्वामी यांचे जीवन आणि शिकवण अध्यात्मिक साधकांना प्रकाश देण्याचे काम करत आहे.
कर्नाटकात मानल्या जाणाऱ्या पारंपरिक हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीयेला दरवर्षी आराधना आयोजित केली जाते. श्री राघवेंद्र स्वामी यांची आराधना साजरी करताना त्यांचे भक्त अत्यंत उत्साहाने त्यांच्या वृंदावनाला अभिषेक, अलंकार, भोजन, रथोत्सव, पालखी सेवा इ. अनेक कार्यक्रम अनेक ठिकाणी करतात. हे कार्यक्रम सबंध भारतात आणि परदेशात आयोजित केले जातात. त्यांचा वारसा, त्यांची शिष्य परंपरा आजही अखंडित सुरू आहे आणि आजही असंख्य भक्तांना प्रेरणा आणि प्रचिती देत आहे.
आज राघवेद्रं स्वामी समाधी दिन आहे.
२००४ सालापासून, नवीन व पुनर्वापरयोग्य ऊर्जास्रोत मंत्रालयाच्या पुढाकाराने, भारतात अक्षय ऊर्जा दिन हा दिवस साजरा होऊ लागला आहे. पारंपारिक वीज जाळ्यावरील ताण कमी होऊन ऊर्जानिर्मितीचे विकेंद्रीकरण व्हावे असाही हेतू यामागे आहे. अशा पहिल्या ऊर्जादिनाच्या निमित्ताने एक पोस्टाचे तिकिटही जारी केले गेले आहे.
आज अक्षय ऊर्जा दिन आहे.
स्व . माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्म दिवस देशभर सदभावना दिवस म्हणून पाळला जातो.
आज राष्ट्रीय सदभावना दिवस दिन आहे.
१९४४: भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मुंबई येथे जन्म. (मृत्यू: २१ मे १९९१)
बेल्लूर कृष्णमाचार सुंदरराजा अय्यंगार हे एक भारतीय योगप्रशिक्षक व लेखक होते. त्यांना अय्यंगार योगा ह्या हठ योग पद्धतीचे जनक मानले जाते. अय्यंगार हे जगातील सर्वोत्तम योग प्रशिक्षकांपैकी एक मानले जात असत. भारतभर व जगभर योगासने लोकप्रिय करण्याचे श्रेय अय्यंगारांना दिले जाते.
देशात तसेच प्रदेशात त्यांनी योग्य अभ्यासाच्या १०० हुन अधिक संस्था त्यात केल्या. २००४ मध्ये ‘टाइम’ पत्रिका ने जगातील प्रभावी व्यक्तींची १०० जणांची सूची त्यात केली त्यात योगाचार्य अय्यंगार ह्यांचे नाव समाविष्ट होते. त्यांच्या कडे योग प्रशिक्षण घेतले त्यात प्रामुख्याने जिद्दू कृष्णमूर्ति, जयप्रकाश नारायण, येहुदी मेनुहिन इ. चा समावेश आहे.
अय्यंगारांच्या योगामधील अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने त्यांना १९९१ साली पद्मश्री, २००२ साली पद्मभूषण तर २०१४ साली पद्मविभूषण हे पुरस्कार बहाल केले. २० ऑगस्ट २०१४ रोजी वयाच्या ९६व्या वर्षी हृदयधक्क्याने त्यांचे निधन झाले.
• २०१४: भारतीय योग प्रशिक्षक व लेखक तसेच अय्यंगार योगा चे निर्माते बी. के. अय्यंगार यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १९१८)
संघ समर्पीत जीवन एका गायकाचं – ” संगीताचा ‘बाल भास्कर ” श्री यादवराव कृष्णराव जोशी
- व्यक्तीगत आयुष्यात त्यांना प्रसिद्धी मिळू शकेल अशा गोष्टीचा त्यांनी संघ कार्य साठी त्यागच केला ती म्हणजे “गायन कला “.
यादवराव हे महान शास्त्रीय गायक होते, संघ प्रचारक नसते तर महान शास्त्रीय गायक म्हणून नावलौकिक मिळवला असता. त्यांचे संगीत गुरू श्री शंकरराव प्रवर्तक त्यांना प्रेमाने बुटली भट्ट (छोटू पंडित) म्हणत असत. डॉ. हेडगेवार यांची त्यांच्याशी पहिली भेट २० जानेवारी , १९२७ रोजी एका मैफिलीत झाली. त्याच संगीत मैफिलीत संगीत सम्राट सवाई गंधर्व हे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या गायनाची स्तुती केली होती. त्या मैफिलीत सम्राट सवाई गंधर्व यांनी यादवरजींना ” संगीताचा ‘ बाल भास्कर” ही उपाधी दिली.
पंडित भीमसेन जोशी यांचे ते गुरुबंधू होते. पंडित भीमसेन जोशी म्हणायचंय यादवरावजींनी जर का संघ कार्याला वाहून घेतले नसते तर भीमसेन जोशी नाव मागे पडले असते.नं तर यादवरावांनी संघास जीवनसंगीत केले. १९४० पासून संघात संस्कृत प्रार्थना सुरू झाली. यादवरावांनी संघशिक्षण वर्गात पहिले गायन केले. संघाच्या अनेक गाण्यांचे स्वरही त्यांनी केले.
श्री यादवराव कृष्णराव जोशी नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे घरी राहून त्यांनी नागपुरातून एमए. एल. एल.बी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संघ कार्याला जीवन समर्पित करण्याचे ठरविले.
१९४० मध्ये प्रचारक म्हणून उत्तर प्रदेशातील झाशी येथे नियुक्ती परंतु संघ संस्थापक डॉक्टरांच्या आजारात सुशृता करण्यासाठी म्हणून नागपूरला परत आले. ते डॉक्टरांच्या अखेर पर्यंत त्यांच्या सेवेत होते . १९४१ मध्ये कर्नाटक प्रांतात संघकार्य विस्तारासाठी नियुक्ती पुढे कर्नाटक व दक्षिण भारत हे त्यांचे कार्यक्षेत्र होते. पुढे ५१ वर्षे संपूर्ण दक्षिण भारतात संघाचा विकास करून अभेद्य अशा हिंदू संघटनेची निर्मितीत त्यांचा मोठा वाटा आहे. कर्नाटकात प्रांत प्रचारक त्यानंतर दक्षिणांचल क्षेत्र प्रचारक म्हणून कार्य केले. अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख तसेच अखिल भारतीय प्रचारप्रमुख म्हणून उत्तरदायित्व पार पाडले.
सन १९७७ ते १९८४ अखिल भारतीय सहकार्यवाह ही जबाबदारी त्यांचे कडे होती. संघ विचारांचा प्रचार होण्यासाठी राष्ट्रोत्त्थान परिषदेची स्थापना व भारत भारती पुस्तकांचे अंतर्गत ५०० महापुरुषांच्या जीवन कथा प्रकाशित केल्या. मा. शेषाद्रीजी द्वारा संपादित परम पूज्य गुरुजींच्या लेखांचा व बौद्धिकांचा संग्रह असणाऱ्या “विचारधन” ही प्रेरणा माननीय यादवराव जोशींचीच.
सेवा कार्याच्या माध्यमातून वस्तीत व दुर्गम क्षेत्रात संघकार्य पोहोचवण्याची योजना, कर्नाटकातील अनेक गावात प्रत्येक व्यक्ती संस्कृत बोलतात संस्कृत प्रचार अभिनयाचे शिल्पकार म्हणून यादवराव जोशी होते.
१९९२ : रा. स्व. संघ कार्याचा दक्षिण भारतात पाया भक्कम करणारे ज्येष्ठय प्रचारक सहसरकार्यवाह श्री यादवराव कृष्णराव जोशी यांचे निधन (जन्म : ३ ऑगस्ट, १९१४ )
- घटना :
१६६६ छत्रपती शिवाजी महाराजांनी दख्खनेमधे येण्यासाठी नरवीर घाटी हे ठाणे ओलांडले.
१८२८: राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
१८९७: सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.
१९१४: पहिले महायुद्ध – जर्मन फौजांनी ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.
१९२०: डेट्रॉइट,मिशिगन येथे जगातील पहिले व्यावसायिक नभोवाणी केंद्र 8MK (सध्याचे WWJ) सुरू झाले.
१९४१: दुसरे महायुद्ध – फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना अटक केली
१९६०: सेनेगलने आपण मालीपासून स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.
१९८८: ८ वर्षांच्या युद्धानंतर इराण-इराक युद्धबंदी करार झाला.
१९९५: भारतातील फिरोजाबाद रेल्वे अपघातात २५८ जणांचा मृत्यू झाला.
२००८: कुस्तीगीर सुशील कुमारला बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.
• मृत्यू :
• १९८४: सुप्रसिद्ध जादूगार रघुवीर भोपळे यांचे निधन. (जन्म: २४ मे १९२४)
• १९८५: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९३२)
• १९८८: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक माधवराव शिंदे यांचे निधन.
• १९९७: गुजराथी नाटककार लेखक प्रागजी डोस्सा यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १९०७)
• २०००: चित्रपट निर्माते प्राणलाल मेहता यांचे निधन.
• २००१: प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष एम. आर. यार्दी यांचे निधन.
• २०११: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९१९)
• २०१३: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली (जन्म: १ नोव्हेंबर, १९४५ )
• २०१३: ज्योतिर्भास्कर, लेखक उद्योजक जयंत साळगावकर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९२९)
- जन्म :
१८५० : प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, काँग्रेसचे चिटणीस, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्म ( मृत्यू : १ सप्टेंबर, १८९३ )
१९४६: इन्फोसिस चे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांचा जन्म.