बेळगाव शुगर इन्स्टिट्यूट येथे हाय प्रेशर बॉयलर सेमिनार

बेळगाव : एस.निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट, बेळगाव येथे हाय प्रेशर बॉयलर ऑपरेशन आणि मेंटेनन्स, डिझाईन आणि वॉटर ट्रीटमेंट या विषयावर नुकताच सेमिनार संपन्न झाला.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी शुगर इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. श्री. खांडगावे, तर प्रमुख पाहुणे डॉ. श्री. लोंढे होते.
सेमिनारसाठी उत्तर कर्नाटकातील साखर कारखानदारीतील प्रतिनिधी हजर होते.

सेमिनारचे प्रमुख वक्ते श्री. वा. र. आहेर (नाशिक) यांनी हाय प्रेशर बॉयलरचे ऑपरेशन आणि मेंटेनन्स या विषयावर बोलतांना, एफिशियंट आणि सुरक्षितपणे बॉयलर चालविण्यासाठी घ्यावयाची काळजी, बॉयलर चालविण्यासाठीचे बॉयलर ॲक्ट १९२३ मधील नियमावली विस्ताराने सांगितली.
फर्नेसपासून चिमणीपर्यंत विविध बॉयलर पार्टचे चालू स्थितीत आणि बंद स्थितीत करावयाच्या कामांची विस्तृत माहितीही आहेर यांनी दिली.
श्री. गोडबोले यांनी बॉयलर डिझाईनची आणि श्री. दिनेश जाधव यांनी बॉयलर वाॅटर ट्रीटमेंट, श्री.काळे यांनी बॉयलर एफिशियन्शी या विषयावर सेमिनारमध्ये माहिती दिली. प्रश्नोतरानंतर आभार प्रदर्शन आणि राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम समाप्त झाला.