शाहू साखर कारखाना देणार एकरकमी रू ३००० , तर दूधगंगा रू ३२०९


कागल : : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२- २३ मध्ये गळीतास येणाऱ्या उसासाठी एकरकमी एफआरपी प्रतिटन तीन हजार रुपये देणार असल्याची माहिती कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे यांनी दिली.
त्या म्हणाल्या, ‘सहकारातील आदर्श स्व. राजे विक्रमसिंह घाटगे संस्थापक असलेला कारखाना ऊस दराबाबत नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. हंगाम २०२२-२३ साठी कारखान्याने ११ लाख टन गळीताचे उद्दिष्ट निश्चित केले असून ते पूर्ण करण्यासाठी सभासद, ऊस पुरवठादार यांनी नोंद केलेला संपूर्ण ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक डॉ. डी एस पाटील, बॉबी माने, प्रा. सुनील मगदूम, शिवाजीराव पाटील यांच्यासह कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.
या कृषी प्रदर्शनात १०० पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग असेल. पशुपक्षी प्राणी प्रदर्शन,प्रि फॅब्रिकेटेड स्टॉल्स, वैविध्यपूर्ण अवजारे तसेच महिला बचत गटांकरिता स्टॉल मोफत असणार आहेत, अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली.
दरम्यान, यापूर्वी हमिदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसासाठी एकरकमी एफआरपी प्रतिटन तीन हजार रुपये देणार असल्याची घोषणा चेअरमन खासदार संजय मंडलिक यांनी दिली पंधरवड्यापूर्वी दिली होती.’
गळीत हंगाम २०२२-२३ साठी कारखान्याने सहा लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.