आज सिंचन दिन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज रविवार, फेब्रुवारी २६, २०२३ रोजीचे

पंचांग आणि दिनविशेष

युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर फाल्गुन ७, शके १९४४
सूर्योदय : ०७:०० सूर्यास्त : १८:४३
चंद्रोदय : ११:१३ चंद्रास्त : ००:४३, फेब्रुवारी २७
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
उत्तरायण
ऋतू : शिशिर
चंद्र माह : फाल्गुन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : सप्तमी – ००:५८, फेब्रुवारी २७ पर्यंत
नक्षत्र : कृत्तिका – ०५:१९, फेब्रुवारी २७ पर्यंत
योग : इन्द्र – १६:२७ पर्यंत
करण : गर – १२:३३ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – ००:५८, फेब्रुवारी २७ पर्यंत
सूर्य राशि : कुंभ
चंद्र राशि : मेष – १०:१५ पर्यंत
राहुकाल : १७:१५ ते १८:४३
गुलिक काल : १५:४७ ते १७:१५
यमगण्ड : १२:५२ ते १४:१९
अभिजित मुहूर्त : १२:२८ ते १३:१५
दुर्मुहूर्त : १७:०९ ते १७:५६
अमृत काल : ०२:४७, फेब्रुवारी २७ ते ०४:२८, फेब्रुवारी २७
वर्ज्य : १६:३९ ते १८:२०

आज सिंचन दिन आहे

महाराष्ट्र शासनाने सिंचन दिन हा २६ फेब्रुवारी रोजी शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.

26 फेब्रुवारी २००४ रोजी शंकरराव चव्हाण यांचे निधन झाले. त्यांनी महाराष्ट्राची सिंचन क्षमता वाढवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. ते दोनवेळा राज्याचे राज्याचे मुख्यमंत्री राहिले. तसेच केंद्रात अर्थमंत्री आणि गृहमंत्री पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली.

।। हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते श्री स्वतन्त्रते ।।
।।तुजसाठि मरण तें जनन ।।
।। तुजवीण जनन तें मरण ।।
।। तुज सकल-चराचर-शरण चराचर-शरण ।।

  • स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाला तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. सावरकरांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक व पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिलेली आहे.

सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला.१ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे प्राण पंचत्त्वात विलीन झाले.

• १९६६: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन. (जन्म: २८ मे १८८३)

घटना :
१९०९: सिनेमाकलर या पहिल्या रंगीत चित्रपट प्रथम पॅलेस थिएटर, लंडन मध्ये प्रदर्शित झाला.
१९२८: बाटून ख्रिश्चन बनलेल्या पिढीजात ख्रिश्चनांना परत हिंदु धर्मात घेण्याची सुरुवात झाली.
१९७६: वि. स. खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.
१९८४: इन्सॅट-१-ई हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशीय भारतीय उपग्रह राष्ट्राला समर्पित केला.
१९९५: बारिंग्ज बँक ही इंग्लंडची सर्वात जुनी गुंतवणूक बँक दिवाळखोरीत निघाली.
१९९८: परळी-वैजनाथ येथील औष्णिक केन्द्राने एका दिवसात १४.७०९ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करून वीजनिर्मितीचा (भारतातील व त्याकाळचा) नवा विक्रम नोंदवला.
१९९९: आशिया खंडातील पहिले तरंगते हॉटेल अशी ख्याती असलेले ठाण्याच्या घोसाळे तलावातील अभिरुची हॉटेल आगीत भस्मसात झाले.

२०१९ : १४ फेब्रुवारी २०१९ पुलवामा हल्ला चोख प्रत्युत्तर- २०१९चा बालाकोट हवाई हल्ला भारतीय वायुसेनेने पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधील बालाकोट शहरावर केलेला हल्ला होता. हा हल्ला २६ फेब्रुवारी, २०१९ रोजी करण्यात आला. भारतीय वायुसेनेच्या १२ मिराज २००० जेट विमानांनी नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाउन बालाकोटजवळील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला चढवला.

भारतीय सैन्यावर पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून हा हवाई हल्ला करण्यात आलेला आहे असे भारतीय सैन्याने सांगितले.भारताच्या शासकीय संस्थाद्वारे असे सांगितले जात आहे की, भारतीय हवाई दलाने जैश-ए-महोम्मद या आतंकवादी गटाच्या बालाकोट येथील प्रशिक्षण शिबीरावर हल्ला केला आणि त्यात जवळपास ३५० प्रशिक्षणार्थींना ठार केले आहे. या हवाई हल्ल्यानंतर भारतीय विमाने कोणत्याही अडथळ्याशिवाय भारताच्या भूमीवर परत आलेली आहेत.

त्यात भारतीय हवाई दलाला कोणतीही क्षती झालेली नाही.

• मृत्यू :
• १८८६: गुजराथी लेखक व समाजसुधारक नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट, १८३३)
• १८८७: भारतीय डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांचा जन्म. (जन्म: ३१ मार्च , १८६५)
• १९३७: मानववंशशास्त्रज्ञ एल. के. अनंतकृष्ण अय्यर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै , १८६२)
• २०००: बेळगाव येथील उद्योगपती बा. म. तथा रावसाहेब गोगटे यांचे निधन.
• २००३: व्यंगचित्रकार राम वाईरकर यांचे निधन.
• २००४: केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे निधन. (जन्म: १४ जुलै, १९२०)
• २०१०: भारतरत्न पुरस्कार सन्मानित समाजसुधारक व संघप्रचारक चंडीकादास अमृतराव तथा नानाजी देशमुख यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९१६ – कडोळी, परभणी, महाराष्ट्र)

जन्म :
१८७४: प्रसिद्ध गुजराथी (सौराष्ट्र) कवी सूरसिंह तख्तसिंह गोहिल ऊर्फ कलापि यांचा जन्म.
१९०८: भारतीय लेखिका लीला मुजुमदार यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल, २००७)
१९२२: चरित्र अभिनेता मनमोहन कृष्ण यांचा जन्म.(मृत्यू: ३ नोव्हेंबर, १९९०)
१९३७: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च, १९९४)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »