अभिनेत्री शांता हुबळीकर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज गुरुवार, जुलै १७, २०२५ युगाब्द : ५१२७
भारतीय राष्ट्रीय सौर आषाढ दिनांक २६, शके १९४७
सूर्योदय : ०६:१० सूर्यास्त : १९:१९
चंद्रोदय : २३:५७ चंद्रास्त : १२:००
शालिवाहन शक : संवत् : १९४७
संवत्सर: विश्वावसू
दक्षिणायन
ऋतु : ग्रीष्म
चंद्र माह : आषाढ़
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : सप्तमी – १९:०८ पर्यंत
नक्षत्र : रेवती – ०३:३९, जुलै १८ पर्यंत
योग : अतिगण्ड – ०९:२९ पर्यंत
करण : विष्टि – ०८:०७ पर्यंत
द्वितीय करण : बव – १९:०८ पर्यंत
क्षय करण : बालव – ०६:०७, जुलै १८ पर्यंत
सूर्य राशि : कर्क
चंद्र राशिमीन – ०३:३९, जुलै १८ पर्यंत
राहुकाल : १४:२३ ते १६:०२
गुलिक काल : ०९:२७ ते ११:०६
यमगण्ड : ०६:१० ते ०७:४९
अभिजित मुहूर्त : १२:१८ ते १३:११
दुर्मुहूर्त : १०:३३ ते ११:२६
दुर्मुहूर्त : १५:४९ ते १६:४१
अमृत काल : ०१:२२, जुलै १८ ते ०२:५३, जुलै १८
वर्ज्य : १६:१४ ते १७:४६

आज आंतरराष्ट्रीय न्यायासाठी दिन आहे.

कानन देवी यांनी वयाच्या १० व्या वर्षी आईबरोबर जयदेव ह्या चित्रपटात भूमिका करायला सुरवात केली. तर १९३४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘माँ’ हा चित्रपटात केलेली भूमिका त्यांना प्रसिद्धी देऊन गेली. ४० च्या द्ष्कार कानन देवी यांनी पार्श्व गायनास सुद्धा सुरवात केली. कानन देवी पुढे मुंबईत येऊन स्थायिक झाल्या. त्यांच्या भूमिका असणारे ‘जयदेव’, ‘प्रल्हाद ‘, ‘विष्णु माया’, ‘माँ’, ‘हरि भक्ति’, ‘कृष्ण सुदामा’, ‘खूनी कौन’, ‘विद्यापति’, ‘साथी’, ‘स्ट्रीट सिंगर’, ‘हार-जीत’, ‘अभिनेत्री’, ‘परिचय’, ‘लगन’, ‘कृष्ण लीला’, ‘फैसला’ और ‘आशा’ इ. हे प्रमुख चित्रपटांचा समावेश आहे.

तर वामुनेर में , अन्नया,मेजो दीदी, दर्पचूर्ण, नव विद्यान, आशा, आधारे आलो , राजलक्ष्मी ओ श्रीकांता ह्या चित्रपटांची निर्मिती केली.
१९७६ मध्ये भारत सरकारने ‘दादा साहेब फाळके’ सन्मानाने पुरस्काराने सन्मानित केले.

१९९२: बंगाली हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका कानन देवी यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १९१६)

आता कशाला उद्याची बात ?
बघ उडुनि चालली रात

भरभरूनि पिऊ, रसरंग नऊ
चल बुडुनि जाऊ रंगात

हा ज्वानीचा बहार – लुटू या
भरवसा न ज्वानीचा
दो दिन ही साथ
हासत करि घात

अभिनेत्री शांता हुबळीकर – मराठी चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात आपल्या अभिनयाने व गायनाने विख्यात झालेल्या अभिनेत्री. कर्नाटकातील हुबळीजवळच्या अदरगुंची या गावी शेतकरी कुटुंबात जन्म. त्यांचे मूळ नाव राजम्मा.

१९९२: अभिनेत्री शांता हुबळीकर यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल, १९१४)

गणितज्ञ सी. एस. शेषाद्री – स्वातंत्र्योत्तर काळात गणिताच्या क्षेत्रात केवळ संशोधनच नव्हे, तर त्या विषयाला वाहिलेली एक संस्था नावारूपाला आणून देशाची गणिती परंपरा पुढे नेणारे गणितज्ञ सी. एस. शेषाद्री .
शेषाद्री यांचा जन्म कांचीपुरमचा. शिक्षण चेन्नई व मुंबई येथे झाले. १९५७ मध्ये ते पॅरिसला गेले अन् त्यानंतर बीजगणितीय भूमितीकडे वळले. ही शाखा गणिताच्या अनेक शाखांना कुठेना कुठे छेदतेच, त्यामुळे तिचा अभ्यास त्यांना महत्त्वाचा वाटला. फ्रेंच गणितज्ञ आंद्रे वेल व हेन्री पॉइनकेअर यांचा प्रभाव त्यांच्यावर होता.

१९६० मध्ये पॅरिसहून परत आल्यानंतर ते टाटा मूलभूत संशोधन संस्थेत रुजू झाले. पुढे १९८०च्या दशकात शेषाद्री हे चेन्नईतील इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस या संस्थेत काम करीत असताना त्यांना एसपीआयसी सायन्स फाऊंडेशन या संस्थेने गणितीय संस्था स्थापन करण्यास सुचवले. त्यावरून शेषाद्री यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिटय़ूटची स्थापना केली. त्यांचे तेव्हाचे अनेक सहकारी हे आज गणित व संगणकशास्त्रात आघाडीवर असून परदेशात कार्यरत आहेत; पण शेषाद्री यांचे वेगळेपण म्हणजे त्यांनी देशातच राहून विद्यार्थी घडवले.
शेषाद्री यांचा साधेपणा, मनमोकळेपणा, जीवनावरचे प्रेम, उत्कृष्टतेचा ध्यास यामुळे अनेक जण प्रभावित होत असत. आधुनिक गणितातील बीजगणितीय भूमिती हा त्यांचा संशोधनाचा प्रांत. त्याचा वापर सांख्यिकी, रोबोटिक्स, कोडिंग व सैद्धांतिक भौतिकशास्त्रात होतो. ‘नरसिंहन-शेषाद्री सिद्धांत’ त्यांनी त्यांचे मित्र नरसिंहन यांच्या मदतीने १९६५ मध्ये विकसित केला.

तो क्षेत्र सिद्धांत व सूत्र सिद्धांतात पायाभूत मानला जातो. शेषाद्री व नरसिंहन यांच्या संशोधनातूनच पुढे ‘शेषाद्री स्थिरांक’ अस्तित्वात आला. आपल्या संशोधनाने त्यांनी गणिताची परंपरा पुढे नेली व त्याचा सांधा संगणकशास्त्र व इतर आधुनिक विज्ञान शाखांशी जोडणारे अभ्यासक्रम सुरू केले. त्यांनी केलेली ही कामगिरी पायाभूत अशीच आहे.

शेषाद्री यांना पद्मभूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, रॉयल सोसायटीची विद्यावृत्ती, अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीची विद्यावृत्ती प्राप्त झाली होती. संशोधन आणि अध्यापन या दोन्ही पातळ्यांवर त्यांनी भरीव काम केले. ‘चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिटय़ूट’ या संस्थेची उभारणी करून अनेक बुद्धिमान तरुणांना गणिताकडे वळवले.

२०२०: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय गणितज्ञ व चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक सी. शेषाद्री यांचे निधन. (जन्म: २९ फेब्रुवारी, १९३२)

  • घटना :
    १८०२: मोडी लिपीतून पहिल्यांदाच मुद्रण करण्यात आले.
    १८१९: अॅडॅम्स-ओनिस करारानुसार फ्लोरिडा हे राज्य अमेरिकेने स्पेनकडुन ५ दशलक्ष डॉलर देऊन विकत घेतले.
    १८४१: सुप्रसिद्ध पंच या विनोदी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित.
    १९४७: मुंबईते रेवस जलवाहतूक करणाऱ्या रामदास या फेरीबोटीला जलसमाधी मिळून सुमारे ७०० लोक मृत्युमुखी.
    १९५५: वॉल्ट डिस्ने यांनी कॅलिफोर्निया येथे डिस्नेलँड सुरू केले.
    १९७५: अमेरिकेचे अपोलो रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली.
    २००४: तामिळनाडुतील कुंभकोणम गावात एका शाळेला लागलेल्या आगीत ९० विद्यार्थी मृत्यूमुखी पडले.

• मृत्यू :

  • २०१२: समाजवादी नेत्या आणि ६ व्या लोकसभेच्या सदस्य मृणाल गोरे यांचे निधन. (जन्म: २४ जून , १९२८)
  • २०१२: भारतीय-इंग्रजी राजकारणी मार्शा सिंह यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९५४)
  • जन्म :
    १९१७: भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक बिजोन भट्टाचार्य यांचा जन्म. ( मृत्यू: १९ जानेवारी,१९७८ )
    १९१९: संगीतकार स्नेहल भाटकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे, २००७)
    १९२४ : संगीत गुरू किंवा गायिका याशिवाय शेकडो बंदीशी, ठुमरी, मराठी गीते आणि भजने यांची रचनाकार म्हणून ओळख असणाऱ्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका सुशीला पोहनकर यांचा जन्म ( मृत्यू : २७ ऑक्टोबर २००७)
    १९३०: मराठीतील एक श्रेष्ठ कथालेखक आणि महाराष्ट्रातील दलित साहित्य विषयक चळवळीचे एक प्रमुख प्रवर्तक बाबूराव बागूल यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च, २००८)
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »