ज्येष्ठ नेते पवार यांची एमसीडीसीला भेट

पुणे : माजी केंद्रीय कृषिमंत्री, ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्र पवार आणि महाराष्ट्राचे माजी सहकारमंत्री आ. दिलीपराव वळसे पाटील यांनी नुकतीच महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या (एमसीडीसी) येथील मुख्य कार्यालयाला भेट दिली. एमसीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे यांनी उभयतांचे स्वागत केले.
महामंडळाच्या विविध योजनांची आणि सध्या सुरू असलेल्या राज्यभरातील कामांची माहिती श्री. तिटकारे यांनी उभयतांना दिली. दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी यावेळी महामंडळाच्या विविध मुद्यांवर चर्चाही केली.
