गिरमकर गेले सर्वांना हुरहुर लावून!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

दौंड शुगरचे प्रॉडक्शन मॅनेजर शशिकांत विश्वनाथ गिरमकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने साखर उद्योगात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे आकस्मिक जाणे सर्वांना हुरहुर लावून गेले आहे. त्यांनी अनेक वर्षे साखर उद्योगासाठी विविध पदांवर योगदान दिले.

स्व. गिरमकर यांच्या साखर उद्योगातील सेवेची सुरुवात भीमा-पाटस साखर कारखान्यातून झाली. तेथे त्यांनी आठ वर्षे केमिस्ट म्हणून काम केले. नंतर ते दोन वर्षे उत्तर प्रदेशला गेले. तेथील कार्यकाल संपवून ते महाराष्ट्रात परत आले आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्यात सिनिअर केमिस्ट म्हणून काही काळ सेवा बजावली.

माळेगाव कारखान्यानंतर ते दौंड शुगर येथे डेप्युटी चिफ केमिस्ट म्हणून रूजू झाले. त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना अल्पावधीत चिफ केमिस्टपदी पदोन्नती मिळाली. पुढे ते दौंड शुगरचे प्रॉडक्शन मॅनेजरही झाले. या पदावर काम करत असतानाच गेल्या आठवड्यात २३ मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. ते अवघे 59 वर्षांचे होते, त्यांना दोन मुले असून, एक सिव्हिल इंजिनिअर आणि दुसरा इलेक्ट्रिक इंजिनिअर आहे. दोघांचाही स्वत:चा व्यवसाय आहे.

कै. गिरमकर हे अत्यंत सुस्वभावी, सर्वांना आपुलकीची वागणूक देणारे आणि सर्वांशी मिळून – मिसळून राहणारे होते. त्यामुळे त्यांना मोठा मित्र परिवार मिळाला. त्यांच्या अकाली जाण्यामुळे आम्ही पोरके झाल्याची भावना कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली आणि असे व्यक्तिमत्त्व आम्हाला पुन्हा मिळणार नाही, अशी खंत व्यक्त केली.

  • दिलीप वारे

दिवंगत गिरमकर यांना ‘शुगरटुडे’ची भावपूर्ण श्रद्धांजली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »