शेखर गायकवाड यांची पुस्तके *शुगरटुडे ऑनलाइन स्टोअर*वर उपलब्ध

पुणे : महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अनेक संदर्भ ग्रंथ लिहिणारे, तसेच विनोदी वा अन्य स्वरूपाच्या वाङ्मयीन लेखनाच्या प्रांतातही सहज मुशाफिरी करणारे लेखक आणि निवृत्त सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांची पुस्तके आता ‘शुगरटुडे ऑनलाइन स्टोअर’ वर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
https://sugartoday.in/online-book-store/ या लिंकवर आपणास पुस्तके मिळतील. त्यासाठी ऑनलाइन बुकिंग करून पुस्तके मागवता येतील. भारतीय प्रशासन सेवेत आपला खास ठसा उमटवणाऱ्या श्री. शेखर गायकवाड यांनी प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, पुणे मनपा आयुक्त, साखर आयुक्त अशा विविध महत्त्वपूर्ण पदावर काम केले. सध्या ते ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक आहेत.
प्रशासनात काम करताना त्यांच्या लक्षात आले की, सामान्य लोक आणि शेतकऱ्यांना प्रशासकीय भाषा समजत नाही, तसेच प्रशासन कसे चालते, महसुली नियम, कायदे कसे आहेत, याची माहिती नाही. त्यामुळे त्यांनी अत्यंत सोप्या आणि ओघवत्या मराठी भाषेत अनेक पुस्तके लिहिली. त्यातील काही पुस्तके प्रशासकीय अधिकारीदेखील संदर्भ ग्रंथ म्हणून वापरतात.
‘शेतकऱ्यांनो सावधान’ हे त्यांचे पहिले पुस्तक होय. प्रख्यात कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी स्थापन केलेल्या ‘भूमाता ट्रस्ट’ने ते प्रसिद्ध केले. त्यानंतर त्यांचे लिखाण अव्याहतपणे सुरू राहिले आणि त्यांनी चाळीसवर पुस्तके लिहिली आहेत. अद्यापही त्यांचे लिखाण सुरूच आहे. ‘सरकारी ऋतुचक्र’ हे त्यांचे नवे पुस्तक २१ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात प्रकाशित होणार आहे. तसेच सनदी अधिकारी राजीव नंदकर लिखित ‘गावविकासातून राष्ट्रविकास’, ‘स्पर्धा परीक्षा प्लॅनर’ आणि ‘जगायचं कसं’ या तीन पुस्तकांचे आणि अवघ्या बारा वर्षांच्या आराध्या नंदकरने लिहिलेल्या ‘सारा पार्कर अँड द विच रिव्हेंज’ पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी होणार आहे.
श्री. गायकवाड यांनी साखर आयुक्त असताना या क्षेत्रासाठीदेखील विपुल लिखाण केले. ‘इक्षुदंड ते इथेनॉल’ हा महाग्रंथ त्यांनी साकार केला. तत्कालीन साखर सहसंचालक आणि महाराष्ट्र सहकारा विकास महामंडळाचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे हे या पुस्तकाचे सहलेखक आहेत.
(महत्त्वाचे : ऑनलाइन पुस्तके बूक करताना तेथेच पेमेंटची सुविधा दिली आहे. ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ हा पर्याय वापरू नये)
श्री. शेखर गायकवाड यांचे पुस्तकांबद्दल मनोगत ऐकण्यासाठी या लिंकवर क्लिक करा




