सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्काराने शेखर गायकवाड यांचा सन्मान

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त सनदी अधिकारी आणि सध्याचे ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांचा सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने नुकताच हृद्य सन्मान करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश उदय लळीत, आचार्य लोकेश मुनी इ. मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने २००३ पासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. देशातील अनेक नामवंतांना संस्थेने आतापर्यंत गौरवलेले आहे. त्यात पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण प्राप्त व्यक्तींचाही समावेश आहे.
या कार्यक्रमाला एअर मार्शल भूषण गोखले, अभिनेते अशोक सराफ, रजा मुराद, भाजप नेते श्याम जाजू आदींचीही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

Shekhar Gaikwad Awarded

श्री. शेखर गायकवाड हे महाराष्ट्रात त्यांच्या नाविन्यपूर्ण आणि जनकेंद्रित प्रशासनासाठी व्यापकपणे ओळखले जातात. तीन दशकांहून अधिक प्रशासकीय अनुभव असलेल्या गायकवाड यांनी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, साखर आयुक्त अशा महत्त्वाच्या प्रशासकीय नेतृत्वाच्या भूमिका यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. तसेच त्यांनी प्रशासकीय अनुभवावर विपुल लिखाण केले असून, त्यांची ३५ पुस्तके प्रसिद्ध आहेत. साखर आयुक्त असताना त्यांनी केलेली कामगिरी महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहणारी आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »