शिऊर साखर कारखान्यात मिल रोलर पूजन

हिंगोली : शिऊर साखर कारखाना (लि. वाकोडी, ता.कळमनुरी, जि. हिंगोली) येथे गाळप हंगाम २०२५-२६ साठी मिल रोलर पुजनाचा कार्यक्रम २६ जून रोजी सकाळी झाला.
यावेळी चेअरमन सुभाषराव लालासाहेब देशमुख, कार्यकारी संचालक सुशीलकुमार देशमुख यांची उपस्थिती होती. वर्क्स मॅनेजर देविदास एकनाथराव कर्हाळे यांनी सपत्नीक रोलर पुजा केली. पुढील गाळप हंगामात साडेपाच लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट साध्य करावे, अशी सूचना चेअरमन देशमुख यांनी यावेळी केली. याप्रसंगी कारखान्याचे सर्व विभाग प्रमुख, खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.