‘श्री छत्रपती’ची नव्याने यादी करण्याचा हायकोर्टाचा आदेश

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नव्याने मतदार यादी तयार करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला दिले आहेत.

संचालक मंडळाची मुदत मे २०२० मध्ये संपली आहे. कोविड लॉकडाउनमुळे निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली गेली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाने २१ एप्रिल रोजी जिल्हा निवडणूक प्राधिकरणाला आदेश देऊन चार आठवड्यामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश दिला होता..

जिल्हा निवडणूक प्राधिकरणाने १२ जुलै प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. त्यावर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यासह अनेकांनी हरकती घेतल्या होत्या. मात्र, जाचक यांच्या हरकती फेटाळून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी २ ऑगस्ट रोजी २३ हजार ३१ सभासदांची अंतिम मतदार यादीही प्रसिद्ध केली.

जाचक यांनी अंतिम मतदार यादीवरती हरकत घेऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
श्री छत्रपती कारखाना, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व जाचक यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने नव्याने मतदार यादी तयार करण्याचा आदेश दिला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »