‘श्री विठ्ठल’मध्ये १०७ दिवसांत ८ लाख टन गाळप
सोलापूर : श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याच्या गळीत हंगामास सुरुवात होऊन अभिजित पाटील १०७ दिवसांमध्ये ८,०५,८४५ मे. टनाचे गाळप केले आहे.
बी हेवी मोलॅसेसमधील साखरेची घट गृहीत धरुन सरासरी १०.६३ टक्के उताऱ्याने ८,११,४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झालेले आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चालू गळीत हंगाम कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून घौडदौड सुरू आहे.
कारखान्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात १०७ दिवसांमध्ये आठ लाख गाळप होण्याची पहिलीच वेळ आहे. एकूण ऊस गाळपापैकी ८० टक्के ऊस ६, ३१,८५५ मे. टन उसाचे गाळप हे कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांनी कारखान्याकडे नोंद दिलेल्या शेतकऱ्यांचे उसाचे गाळप केलेले आहे.
उर्वरित २० टक्के ऊस १,७४,००० मे. टन कार्यक्षेत्राबाहेरील गेल्यावर्षी ज्यांनी ऊस दिला होता त्या शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप झालेले आहे. कारखान्याने आतापर्यंत केलेल्या गाळपामुळे ऊस बिलापोटी रु. २३३ कोटी व तोडणी वाहतुकीपोटी रु. ७२.५० कोटी रक्कम, अशी एकूण ३०० कोटींची उलाढाल झालेली आहे.
श्री विठ्ठल कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी इतर कारखान्यांच्या भूलथापांना बळी न पडता ऊस गाळपासाठी द्यावा. १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून त्याच मागनि प्रवास सुरू आहे, असे कारखान्याने म्हटले आहे.