श्रीदत्त इंडियाचे दहा लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सातारा : श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याने आगामी गळीत हंगामामध्ये 10 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, त्या अनुषंगाने तोडणी व वाहतूक यंत्रणेची करार प्रक्रिया पार पडली आहे, अशी माहिती देऊन, ‘मागील 4 गळीत हंगामात शेतकऱ्यांना वेळच्या वेळी दिलेल्या चोख पेमेंटमुळे 10 लाख टन गाळप होण्यास कोणतीही अडचण येणार नाही,’ असे प्रतिपादन श्री दत्त इंडियाचे साखर कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी कारखान्याच्या 5 व्या मिल रोलर पूजन समारंभ प्रसंगी केले.

फलटण श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महंत शामसुंदर शास्त्री यांच्या हस्ते विद्युत कळ दाबून मिल रोलर बसवण्याच्या कामाचा शुभारंभ पार पडला. तत्पूर्वी रोलर पूजन इंजिनिअरिंग विभागाचे डेप्युटी चिफ इंजिनियर नितीन रणवरे यांच्या हस्ते करण्यात आले.

अजितराव जगताप म्हणाले, मागील हंगामापासून कारखान्याची गाळप क्षमता वाढली असून दैनंदिन आठ हजार क्षमतेने कारखान्याचे गाळप होणार आहे. शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेत गाळप होण्यास यामुळे मदत होणार आहे. त्यामुळे फलटण तालुक्यातील व भागातील सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्यास घालून सहकार्य करावे.

कार्यक्रमाला कारखान्याचे संचालक चेतन धारू, चीफ इंजिनिअर अजित कदम, को जन मॅनेजर दीपक मोरे, केन मॅनेजर सदानंद पाटील, शेतकी अधिकारी रमेश बागनवर, प्रोसेसचे जी एम भारत तावरे, चिफ केमिस्ट नितीन नाईकनवरे, एच आर विराज जोशी, ऋतुराज पाटील, डेप्युटी चीफ इंजिअर किशोर फडतरे, सुरक्षा अधिकारी अजय कदम, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे राजेंद्र भोसले, पै संतोष भोसले, पै महेश भोसले, खजिनदार गोरख भोसले, केन सुपरवायझर एस के भोसले, परिसरातील शेतकरी, कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »