‘श्रीनाथ म्हस्कोबा’चे मिल रोलर पूजन उत्साहात
६ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
पुणे : ऊस गळीत हंगाम २०२३- २४ साठी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मिल रोलर पूजन उत्साहात पार पडले. या हंगामात ६ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग राऊत यांनी दिली.
कारखान्याचे कर्मचारी अहर्निश परदेशी व त्यांच्या पत्नी स्वाती यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन करण्यात आले.
आगामी हंगामासाठी कारखान्याकडे १०२०९ हेक्टर उसाची नोंद झाली असून, नोंदणी झालेल्या उसाचे गाळप वेळेत होण्यासाठी वाहतूक करार करण्यात आले आहेत. मागील हंगामात गाळप केलेल्या उसाच्या एफआरपीपोटी रु. २७०० रुपये टनाप्रमाणे शेतकऱ्यांची बिले दिली असून, उर्वरित रक्कम लवकरच देण्यात येईल, असे राऊत यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला संचालक महेश करपे, किसन शिंदे, माधव राऊत, अंकुशराव ढमढेरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर, सरव्यवस्थापक आर. एन. यादव, आर. एस. शेवाळे, चिफ इंजिनिअर व्ही. व्ही. क्षीरसागर, केन मॅनेजर एस. बी. टिळेकर, एच. आर. मॅनेजर धन्यकुमार रणवरे, मार्केटिंग ऑफिसर नवनाथ गाडे, स्टोअर व पर्चेस ऑफिसर संतोष रोडे, शेतकी अधिकारी अशोक शेंडगे, ऊसविकास अधिकारी दीपक रोडे तसेच सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.
कारखान्याने ऊस लागण यंत्र, पाचट कुट्टी मशिन, खोडकी छाटणी यंत्र, सरी फोडणी यंत्र आदी शेती अवजारे उपलब्ध केली आहेत, त्याचा शेतकऱ्यांनी भाव घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर यांनी केले आहे.