सुरक्षा साधनांचा न चुकता वापर करा : डी. एम. रासकर
पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यात ५३ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहनिमित्त कर्मचारी यांचेकरिता सुरक्षाविषयक मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण देशात ४ मार्च ते १२ मार्च या कलावधीत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो. कारखान्यामध्ये सुरक्षाविषयक जागृती निर्माण करण्यासाठी सुरक्षा बाबतचे माहिती पत्रके, पोस्टर्स, बॅच विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कारखान्यात काम करताना कारखान्याने उपलब्ध केलेल्या सुरक्षा संसाधनांचा वापर नियमितपणे करावा. कामाच्या स्वरूपानुसार हेल्मेटचा वापर, सेफ्टी शूज, ईयर प्लग, हँड ग्लोज, सेफ्टी बेल्ट, मोबाइलचा वापर न करणे अशा विविध सुरक्षा संसाधनाचा वापर व त्याचे होणारे फायदे या बाबत मार्गदर्शन केले.
सुरक्षा शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर आर. एस. शेवाळे, चिफ इंजिनीअर व्ही. व्ही. क्षीरसागर, शेतकी अधिकारी ए. बी. शेंडगे, एन. ए. भुजबळ, आर. आर. होले, सुरक्षा अधिकारी एस. एच. पवार तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.