‘सोमेश्वर’चे विक्रमी १५ लाख टन गाळप

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : सोमेश्वर साखर कारखान्याने विक्रमी १५ लाख टन गाळप करत १७ लाख ९५ हजार क्विटल साखरेचे उत्पन्न घेतले आहे. साखर उताऱ्यातही बाजी मारत, ११.९८ टक्के साखर उताऱ्यासह ‘सोमेश्वर’ने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

जिरायती भागातील पाणीटंचाईचे सावट पाहता कारखाना प्रशासनाकडून तातडीने या भागातील ऊस गाळपास आणला जात आहे. वाढलेल्या उन्हामुळे ऊस तोडणी मजूर पहाटेच ऊसतोड करीत आहेत. मार्च महिन्यातच गाळप हंगाम संपण्याची शक्यता होती, मात्र २५ एप्रिलपर्यंत हंगामाची सांगता होणार आहे.

जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने बंद झाल्यानंतर सोमेश्वरचा हंगाम अजूनही आठवडाभर चालण्याची शक्यता आहे. गेल्याच आठवड्यात माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम बंद झाला.

त्यापाठोपाठ सोमेश्वरचाही हंगाम बंद होणार आहे. हंगाम बंद होणार असल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतकरी कारखाना परिसरात वाढे खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. पुढील हंगामासाठी ८ लाख टन ऊस सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे १५ मार्चपर्यंत २७ हजार ५०७ एकर उसाची नोंद झाली आहे. पुढील हंगामात कारखान्याकडे ८ लाख टन ऊस उपलब्ध होईल. ४ ते ५ लाख टन ऊस गेटकेनचा आणावा लागणार आहे. सोमेश्वरने १५ एप्रिलपर्यंत लागणीला मुदतवाढ दिली होती.

चालू वर्षी टंचाईच्या झळा सोमेश्वर कारखान्याला बसल्या आहेत. कार्यक्षेत्रात केवळ ६० टक्के ऊस लागवड झाली आहे. गेल्या वर्षी कारखान्याकडे ४२ हजार एकराची नोंद होती तर चालू वर्षी २७ हजार एकराची नोंद झाली आहे..

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »