स्व. पतंगराव कदम यांच्या स्मरणार्थ ‘सोनहिरा’वर भव्य लोकतीर्थ स्मारक
सांगली : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि सोनहिरा साखर कारखान्याचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा व लोकतीर्थ स्मारकाचे लोकार्पण लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते गुरुवारी झाले.
सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या क्षेत्रात हे भव्य स्मारक आणि पुतळा उभा करण्यात आला आहे. हे स्थळ प्रेक्षणीय आणि प्रेरणादायी ठरणार आहे.
यावेळी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. के. सी. वेणुगोपाल, माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम, माजी आमदार मोहनराव कदम, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम, स्वप्नाली कदम, अस्मिता जगताप, खा. मुकुल वासनिक, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे,
आमदार नितीन राऊत, आ. बाळासाहेब थोरात, आ. सतेज पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खा. विशाल पाटील, खा. प्रणिती शिंदे, खा. धैर्यशील मोहिते, आमदार संजय जगताप, शिवाजीराव नाईक, आमदार सुमन पाटील, आमदार अरुण लाड, आमदार मानसिंगराव नाईक आदींची उपस्थिती होती.
डॉ. पतंगराव कदम यांचे लोकतीर्थ स्मारक म्हणजे भावी पिढीला दिशादर्शक ठरणारा दीपस्तंभ मानले जात आहे. याप्रसंगी देश आणि राज्यपातळीवरील दिग्गज नेतेमंडळी आणि मान्यवर, तसेच राज्यातील हजारो कार्यकर्त्यांनी डॉ. पतंगराव कदम यांचा जयघोष केला.
पूर्णाकृती पुतळा अनावरणानंतर राहुल यांनी यांनी, विश्वजित कदम, आमदार मोहनराव कदम, डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम, स्वप्नाली कदम, अस्मिता जगताप आदी कदम कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली.