चारूदत्त देशपांडे यांना ‘एसटीएआय’चा मानाचा पुरस्कार
कराड : जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट चारूदत्त देशपांडे यांना द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एसटीएआय) वतीने साखर उद्योगाच्या विकासात दिलेल्या योगदानाची दखल घेत प्रक्रिया अभियांत्रिकीसाठी ‘इस्जेक गोल्ड मेडल’ हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
जयपूर, राजस्थान येथे दि. ३० जुलै २०२४ रोजी होणाऱ्या संस्थेच्या ८२ व्या वार्षिक अधिवेशनामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते देशपांडे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया ही साखर उद्योगासाठी काम करणारी राष्ट्रीय पातळीवरील संस्था आहे. ही संस्था भारताच्या साखर उद्योगासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन, साखर आणि संबंधित उत्पादनांची गुणवत्ता तसेच उत्पादकता वाढवण्यासाठी किफायतशीर आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणण्यासाठी सातत्याने कार्यरत असते.