साखर आयुक्त कक्षातील व्हिडिओ व्हायरल

पुणे : साखर आयुक्तांच्या केबिनमध्ये एका शिष्टमंडळाच्या कार्यकर्त्याने चित्रित केलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र हा प्रकार नेमक्या कोणत्या कारणावरून झाला हे समजू शकले नाही. सूत्रांच्या दाव्यानुसार, एका संघटनेचे शिष्टमंडळ एफआरपी संदर्भात भेटण्यासाठी आले तेव्हा हा प्रकार घडला.
सोमवारी एका संघटनेचे कार्यकर्ते साखर आयुक्त कार्यालयात गेले होते, त्यावेळी प्रभारी साखर आयुक्त दीपक तावरे होते, त्यावेळी कार्यकर्त्यांनी तेथे घडलेल्या प्रकाराचे व्हिडिओ शूटिंग केले. त्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.