राज्यातील साखर कारखाने हे लुटारूंचे अड्डे : रघुनाथ पाटील

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अहिल्यानगर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आयोजित मेळाव्यात शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सध्या शेतकऱ्यांच्या कुठल्याही शेतमालाला सध्या समाधानकारक भाव मिळत नसून, सर्वच साखर कारखाने हे लुटारूंचे अड्डे बनल्याचा आरोप करत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे तालुक्‍्यातील शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि. ९) शेतकरी मेळावा आयोजित केला होता. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरीवर्ग उपस्थित होता.

या शेतकरी मेळाव्याला शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजी नांदखिले, शेतकरी संघटनेचे लक्ष्मणराव वडले, युवराज पाटील, अरुण गोरे, भास्कर तुवर, बाबासाहेब खराडे, भाऊसाहेब तराळ, विश्वास मते, महेश ढोकणे. सधाकर देशमुख. सोमनाथ औटी, अशोक ढगे, पुरुषोत्तम सर्जे, ज्ञानेश्वर शिरसाट, बाळासाहेब कावळे, दत्तात्रय निकम, दादासाहेब नाबदे आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होण्यासाठी संघर्ष सुरू

मेळाव्याला मार्गदर्शन करताना शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील म्हणाले की, राज्यात शेतकऱ्यांच्या कुठल्याही शेतमालाला सध्या समाधानकारक भाव मिळत नाही. सध्या राज्यातील सर्वच साखर कारखाने हे लुटारूंचे अड्डे बनल्याचा आरोप करत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.  अॅड. काळे म्हणाले सातबारा कोरा करण्याची मोहीम शेतकरी संघटनेच्या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यापासून चालू असून महाराष्ट्रमध्ये जिथे शक्य होईल तिथे तिथे जाऊन आम्ही आमची भूमिका मांडत आहोत. शेतकऱ्याचा सातबारा हा कोरा झाला पाहिजे, यासाठी हा संघर्ष सुरू आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »