साखर कामगार वेतन वाढीसाठी सरकारकडे आग्रह – काळे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नगर : साखर कामगारांच्या वेतनवाढीचा करार 31 मार्च 2024 रोजी संपत आहे. नवीन वेतनवाढ मिळावी यासाठी कामगार संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेऊन, सर्व समावेशवक वेतनवाढीची मागणीसाठी सरकारकडे आग्रह धरणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिली.

साखर कामगारांच्या नवीन वेतनवाढीच्या अनुषंगाने चर्चा करण्याकरिता नगर जिल्ह्यातील कामगार संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत काळे बोलत होते. नेवासा तालुक्यातील सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखाना येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष रावसाहेब पाटील, सरचिटणीस शंकरराव भोसले, वसंतराव शेवाळे, मुळा कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोकराव पवार, सचिव डी.एम.निमसे,उपाध्यक्ष कारभारी लोडे, खजिनदार सुभाष सोनवणे, कामगार संचालक विश्वास डेरे , किशोर राजगुरू, युनियनचे सदस्य वामनराव निमसे, रामकिसन पालवे, अर्जुन काकडे, बाळासाहेब बोरूडे, योगेश भगत, गोविंद कोंगे, सुनील कुंठारे, सुनील गरगडे, सुखदेव गणगे , बाळासाहेब घावटे, गोवर्धन बेल्हेकर, सचिन काळे,आंशिक सय्यद , गोरक्षनाथ शिंदे, गंगाधर जहाड , रावसाहेब शेळके, प्रमोद मोरे,शाहादेव पाठे व कामगार आदि यावेळी उपस्थित होते.

काळे म्हणाले की, कामगारांच्या प्रश्नासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं ही शिकवण बी. आर. पाटील, साथी किशोर पवार, बबनराव पवार या दिवंगत नेत्यांनी आपल्याला दिलेली आहे. साखर कामगार आनंदी असला पाहिजे यासाठी आपल्याला काम करायचे आहे.

जिल्हानिहाय बैठका घेऊन पदाधिकारी कार्यकर्त्याशी चर्चा करून सगळ्यांच्या विचारातून सर्व नवीन वेतनवाढ़ीचा समावेशक मसुदा तयार करून फेब्रुवारी महिन्यात राज्य शासनाला सादर करण्यात येईल. मुळा साखर कामगार संघटनेचे नेतृत्व उत्तम काम करीत असून त्यांनी जिल्ह्यातही काम करावे, राज्य संघटना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही काळे यांनी दिली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »