साखरेची एमएसपी वाढवायची की नाही याचा लवकरच फैसला

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : साखरेच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करायची की नाही, याबाबत सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचे केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी सांगितले.
२०१९ पासून साखरेची एमएसपी 31 रुपये प्रति किलो या दराने कायम आहे, त्यामुळे ‘इस्मा’, ‘विस्मा’, ‘एनएफसीएसएफ’ आदी संस्थांनी, वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि साखर कारखान्यांवरील आर्थिक बोजामुळे एमएसपीमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे.

इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) आणि नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज (NFCSF) यांनी वाढता साखर उत्पादन खर्च पाहता आणि साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पाहून बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी MSP मध्ये 39.14 रुपये प्रति किलो किंवा अगदी 42 रुपये प्रति किलोपर्यंत वाढवण्याचा आग्रह धरला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »