ऐन सणासुदीत साखरेच्या दरात वाढ होण्याचा अंदाज

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : केंद्र सरकार हे दर महिन्याला साखरेचा कोटा जाहीर करत असते. त्यानुसार केंद्र सरकारने ऑक्टोबर महिन्याचा कोटा जाहीर केला आहे. या महिन्यासाठी सुमारे २४ लाख टन साखरेचा कोटा खुला केला आहे. तो गेल्यावर्षीच्या तुलनेत १.२५ लाख मेट्रिक टनांनी कमी आहे. गतवर्षी २०२४ मध्ये २५.२५ लाख मेट्रिक टन साखरेचा कोटा देण्यात आला होता. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यावर्षी १.२५ लाख मेट्रिक टनांनी कोटा कमी केल्यामुळे बाजारातील साखरेची उपलब्धता मर्यादित असेल. त्यात दसरा-दिवाळी हे सण असल्याने या दिवसांत साखरेला मागणी जास्त असते. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर ऐन दसरा-दिवसाळीच्या सणांत साखरेच्या भावात क्विंटलला २० ते २५ रुपयांनी निश्चित वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.. अलीकडील काही वर्षांत सणाची आतुरता व नावीन्यता काहीशी कमी होत चालल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे दिवाळी फराळाच्या जिनसांना मागणी कशी राहते, त्यावरही साखर दरातील तेजीचे गणित अवलंबून राहील, हे मात्र नक्की.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »