राज्यात आठ लाख टनांनी साखर उत्पादन घटले

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे: ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 207 साखर कारखान्यांमधून 716.03 लाख मे. टन ऊस गाळप झाले आहे. त्यातून सरासरी 9.67 टक्के साखर उतार्‍यासह 69. 25 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे, मात्र गेल्या हंगामापेक्षा ते सुमारे आठ लाख टनांनी कमी आहे.

साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या ४ फेब्रुवारी अखेरपर्यंतच्या गाळप अहवालानुसार, मागील हंगामात 77.82 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते, मात्र यंदाच्या हंगामात 8.11लाख टनांनी उत्पादनात घट झाली आहे.

कोल्हापूर विभाग आघाडीवर
कोल्हापूर विभागाने 162.37 लाख मे. टन उसाचे गाळप केले असून, 11.03 टक्के उतार्‍यासह 179.1 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कोल्हापूरमध्ये सर्वाधिक साखरेचे उत्पादन झाले आहे.
पुणे विभागाने 153.16 लाख मे. टन उसाचे गाळप केले असून, साखरेचा उतारा 9.93 टक्के सह 152.07 लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. तर सर्वाधिक ५० साखर कारखाने सुरू असलेल्या सोलापूरमध्ये 154.51 लाख मे. टन ऊस गाळप झाला असून, सरासरी 8.88 टक्के साखर उतार्‍यासह 137.22 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

त्याचप्रमाणे, अहमदनगरमध्ये 90.29 लाख मे. टन ऊस गाळप झाले असून 9.38 टक्के साखर उतार्‍यासह 84.73 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 66.9 लाख मे. टन ऊस गाळप होऊन 8.32 टक्के साखर उतार्‍यासह 55.69 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. नांदेड भागात 79.97 लाख मे टन ऊस गाळप झाला असून, 9.6 टक्के साखर उतार्‍यासह 76.79 लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे.

अमरावतीत 6.58 लाख मे. टन ऊस गाळप झाले आहे. 9.01 टक्के साखर उतार्‍यासह 5.93 लाख क्विंटल साखरेचे उत्पन्न झाले आहे व नागपूरमध्ये 2.25 लाख मे. टन ऊस गाळप झाले असून, 4.4 टक्के साखर उतार्‍यासह 0.99 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

मागील हंगामात 797.2 लाख मे. टन ऊस गाळप झाले होते, 9.76 टक्के साखर उतार्‍यासह 778.2 लाख क्विंटल साखर उत्पादित झाली होती. सर्व राज्यातील होणारे ऊस गाळप, सरासरी साखर उतारा आणि होणारे नवे साखर उत्पादन बघता मागील हंगामाच्या तुलनेत अपेक्षित साखर उत्पादन 81.17 लाख क्विंटलने कमी भरले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »