साखर उत्पादनात थोडी घट
नवी दिल्ली : सध्याच्या साखर हंगामामध्ये 15 मार्चपर्यंत देशातील साखर उत्पादन 28.18 दशलक्ष टन (MT) म्हणजे सुमारे २८२ लाख टन एवढे होते. गत हंगामाच्या तुलनेत त्यात किरकोळ घट झाली आहे, असे ISMA (इंडियन शुगर मिल्स असो.) ने सांगितले.
2021-22 शुगर मार्केटिंग वर्षाच्या याच कालावधीत साखर उत्पादन 28.45 दशलक्ष टन होते.
इंडियन शुगरमिल्स असोसिएशन (ISMA) च्या मते, “हंगाम आढाव्याच्या कालावधीत 438 साखर कारखाने गेल्या हंगामात सुरू होते, यंदा ही संख्या सुमारे 336 साखर आहे.
इथेनॉल उत्पादनाकडे वळवलेली साखर वजा केल्यानंतर, ऑक्टोबर २२ – मार्च २३ या दरम्यान देशातील साखर उत्पादन 28.18 दशलक्ष टन होते, अशी माहिती ‘इस्मा’ने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
महाराष्ट्रातील साखर उत्पादनातही किंचित घट झाली आहे. मागच्या हंगामात १५ मार्च पर्यंत १०९ लाख टन साखर उत्पादित झाली होती, यंदाच्या हंगामात याच कालावधीतील साखर उत्पादन सुमारे १०२ लाख टन भरले आहे. सुमारे सात लाख टनांची घट आहे.
देशातील तिसर्या क्रमांकाचे साखर उत्पादक राज्य असलेल्या कर्नाटकातील उत्पादनातही किरकोळ घसरणीसह ५४ लाख मेट्रिक टन एवढे झाले आहे. जे गेल्या वर्षी तुलनेने कालावधीत ५५ लाख मेट्रिक टन होते, असे ISMA ने निवेदनात म्हटले आहे.