साखर उत्पादन ४५ लाख टनांनी घटणार : ICRA
मुंबई : यंदाच्या हंगामात (२०२४-२५) देशांतर्गत साखर उत्पादन सुमारे ४५ ते ४६ लाख टनांनी घटणार असल्याचा अंदाज ICRA (इन्व्हेस्टमेंट इन्फो अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी) या संस्थेने वर्तवला आहे. या आधी ‘इस्मा’नेही उत्पादन घटणार असल्याचा अहवाल जाहीर केला होता.
वर्ष २०२५ मध्ये निव्वळ साखर उत्पादन २७४ लाख टनांपर्यंत घसरेल. त्याचे प्रमुख कारण पुरेशा ऊस उपलब्ध नसणे हे आहे. या हंगामात देशभर कार्यरत साखर कारखान्यांची संख्या ४९३ आहे, ती गेल्या वर्षी ५१२ होती, असे ICRA ने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे. मागच्या साखर हंगामात एकूण देशांतर्गत साखर उत्पादन ३२० लक्ष मेट्रिक टन होते.
अहवालात असेही म्हटले आहे की, यंदाच्या हंगामात डिसेंबर अखेरपर्यंत साखर उत्पादन ९५.४ लक्ष मेट्रिक टन भरले, जे मागील वर्षी याच कालावधीत ११३ लक्ष मेट्रिक टन होते. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात या सर्वात मोठ्या साखर उत्पादक राज्यांमधील साखर कारखान्यांना ऊसटंचाईचा मोठा फटका बसला आहे.
अहवालात नमूद करण्यात आले आहे की, चालू हंगामात साखर उत्पादनात अनपेक्षित घट झाल्यामुळे, जानेवारी २०२५ मध्ये देशांतर्गत साखरेच्या किमती (उत्तर प्रदेश) वाढून ३८.५ रुपये प्रति किलो झाल्या, डिसेंबर २०२४ मध्ये त्या ३६ रुपये प्रति किलो होत्या. आंतरराष्ट्रीय साखरेच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर, कच्च्या साखरेच्या किमती नोव्हेंबर २०२४ मध्ये ४७७ डॉलर प्रति मेट्रिक टन वरून डिसेंबर २०२४ मध्ये ४४९ डॉलर प्रति मेट्रिक टन झाल्या.
शुभ्र साखरेच्या अशा किमती देखील नोव्हेंबर २०२४ मध्ये ५६० डॉलर प्रति मेट्रिक टन वरून डिसेंबर २०२४ मध्ये ५२९ डॉलर प्रति मेट्रिक टन झाल्या. अहवालात पुढे म्हटले आहे की, शुभ्र आणि कच्च्या साखरेमधील प्रीमियम डिसेंबर २०२४ मध्ये ८० डॉलर प्रति मेट्रिक टन होता, जो मागील महिन्यातील ८३ डॉलर प्रति मेट्रिक टन पेक्षा कमी आहे.