राज्यातील साखर उत्पादन ८३ लाख टनांवर जाण्याचा अंदाज

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात २८ फेब्रुवारी 2025 अखेर ८०१ लाख टन उसाचे गाळप झाले असून, ७४.९० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उताऱ्याचा दर सुमारे 9.35 टक्के इतका आहे. जाणकारांच्या मते यंदाच्या हंगामात साखर उत्पादन ८३ लाख टनांपर्यंत जाईल, असे NFCSF ने म्हटले आहे.

गाळप सुरू करणाऱ्या सुमारे दोनशे कारखान्यांपैकी ९४ साखर कारखान्यांनी आपला गाळप हंगाम आटोपला आहे, NFCSF ने (राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ) म्हटले आहे . मात्र साखर आयुक्तालयाच्या २७ च्या आकडेवारीनुसार ७० कारखान्यांचे गाळप संपले आहे. या मध्ये कोल्हापूर विभागातील 11, पुणे विभागातील 7, सोलापूर विभागातील 38, छत्रपती संभाजीनगर विभागातील 1, अहिल्यानगर विभागातील 6 तसेच नांदेड विभागातील 7 कारखान्यांचा समावेश आहे.

मागील हंगामात 207 साखर कारखाने सुरु झाले होते. यात 103 सहकारी तसेच 104 खाजगी कारखान्यांचा समावेश होता. या कारखान्यांनी 913.38 लाख टन उसाचे गाळप करून 912.57 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. राज्याचा एकूण सरासरी साखर उताऱ्याचा दर सुमारे 9.99 टक्के इतका होता. 23 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम समाप्त केला होता.
NFCSF च्या अंदाजानुसार उत्तर प्रदेश यावेळी महाराष्ट्राला मागे टाकत ९२ लाख मे. टन साखर उत्पादनासह पहिल्या क्रमांकावर राहील, तर महाराष्ट्र ८३ लाख मे. टनांसह दुसऱ्या स्थानी आणि कर्नाटक ४१ लाख मे. टनांसह तिसऱ्या स्थानी राहील. इतर राज्यांचे साखर उत्पादन एक अंकी आकड्यातच असेल.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »