महाराष्ट्रात गत हंगामापेक्षा अधिक साखर उत्पादन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : महाराष्ट्रात यंदाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना, साखरेचे उत्पादन १०७ लाख टनांवर पोहोचले आहे. ते गेल्या हंगामापेक्षा जास्त आहे.

यंदाच्या गळीत हंगामात एकूण २०७ साखर कारखान्यांनी सहभाग घेतला. यामध्ये १०३ सहकारी आणि १०४ खाजगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत १०४९.४० लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर ३१ मार्च अखेर राज्यात १०७३.१६ लाख क्विंटल (१०७.३१ लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे.

गेल्यावर्षी २११ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला होता आणि १०५२.२९ लाख टन उसाचे गाळप करून १०५०.०७ लाख क्विंटल (१०५.०७ लाख टन) साखरेचे उत्पादन केले होते. महाराष्ट्रात चालू हंगामात केवळ १४० साखर कारखान्यांनी गाळप थांबवले आहे. तर गेल्या हंगामात ३१ मार्चपर्यंत २०० साखर कारखान्यांनी गाळप थांबवले होते. चालू हंगामात साखरेच्या उताऱ्यात वाढ दिसून येत आहे.

यंदाच्या हंगामात, ३१ मार्चअखेर राज्यातील साखरेचा उतारा १०.२३ टक्के आहे, तर गेल्या हंगामात या वेळेपर्यंत साखर उतारा ९.९८ टक्के होता. कोल्हापूर विभागात २६ साखर कारखाने, सोलापूर विभागात ४३ साखर कारखाने, पुणे विभागात १८ साखर कारखाने, अहमदनगर विभागात १४ साखर कारखाने, छत्रपती संभाजी नगर विभागात १६ साखर कारखाने, नांदेड विभागात २० साखर कारखाने आणि अमरावती विभागात ३ साखर कारखाने बंद झाले आहेत. राज्यात चालू हंगामात ३१ मार्च अखेर एकूण १४० साखर कारखाने बंद झाले आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »