अपेक्षाभंग : साखर कंपन्यांच्या शेअर्सची घसरण
अवध शुगर, बजाज हिंदुस्थान, ईआयडी पॅरी, केसीपी शुगर, राजश्री शुगर्स, शक्ती शुगर्स, उगार शुगर वर्क्स आणि उत्तम शुगरचे शेअर्स बजेटनंतर घसरले.
मुंबई : साखर उद्योगासाठी अपेक्षित घोषणा न झाल्याने काही कंपन्यांच्या शेअर्सची मुंबई शेअर बाजारात घसरण झाली.
साखरेच्या एमएसपी मध्ये वाढ, इथेनॉलच्या निर्मितीवरील निर्बंध मागे घेणे, साखर निर्यातीस परवानगी देणे इ. अपेक्षा साखर उद्योगाकडून व्यक्त करण्यात आल्या होत्या.
अवध शुगर, बजाज हिंदुस्थान, ईआयडी पॅरी, केसीपी शुगर, राजश्री शुगर्स, शक्ती शुगर्स, उगार शुगर वर्क्स आणि उत्तम शुगरचे शेअर्स बजेट घोषणेनंतर 2-4 टक्क्यांनी घसरले.
साखरेसाठी एमएसपी, 2018 मध्ये 29 रुपये प्रति किलो होता आणि 2019 मध्ये तो वाढवून 31 रुपये प्रति किलो केला गेला होता, त्यानंतर म्हणजे, पाच वर्षांपासून त्यात वाढ करण्यात आलेली नाही, जेव्हा की एफआरपी मध्ये दरवर्षी वाढ होत आहे, त्यामुळे एमएसपी आणि एफआरपीची सांगड घालावी, अशी मागणी साखर उद्योगाने लावून धरली आहे.