३० टनांची साखर चोरी पकडली, तिघांवर गुन्हा दाखल

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : जिल्ह्यातील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने विक्रीसाठी पाठवलेल्या ३० टन साखरेची चोरी झाली असून, या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रक मालक सोहेल दस्तगीर पटेल रा. लक्ष्मीनगर,मलकापुर ता. कराड जिल्हा सातारा यास कोडोली पोलिसांनी अटक करून ट्रक सह त्यांच्या ताब्यात असलेली २३ टन ८५० किलो साखर जप्त केली आहे.

दिग्वीजय बाळासो मल्लाडे रा. बिरदेव मंदीर जवळ दानोळी ता शिरोळ जि. कोल्हापुर साईनाथ ट्रासपोर्ट शिरोली व्यवसायिकाने कोडोली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दि. ७ मार्च रोजी दाखल करण्यात आला होता. यामध्ये ट्रक मालक – सोहेल दस्तगीर पटेल यास अटक झाली असून ट्रक चालक सिध्दांत गवंड,मनोहर केदारे हे दोघे अद्याप फरारी आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

वारणा कारखान्यात साखरेने भरलेला ट्रक दि. ८ मार्च रात्री २१.२२ वा. पर्यंत ब्रिटानिया इंडस्ट्रीज कंपनीस न उतरता स्वतःच्या फायद्याकरीता फिर्यादी ची फसवणुक करुन अपहार केले बाबत दाखल गुन्हातील चोरीला गेलेल्या साखर पोत्यापैकी २३ टन ८५० किलो मुद्देमाल ट्रकसह जप्त केला आहे. ६ टन २५० किलो वजनाची साखर जप्त करणे बाकी आहे. कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक कैलास कोडग फौजदार नामदेव दांडगे व पोलिस कर्मचारी यानी तीन दिवसात या गुन्ह्याचा छडा लावला आहे.

दिग्विजय यांच्या श्री साईनाथ ट्रान्स्पोर्ट कंपनीचा सांगली फाटा, शिरोली येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांनी गौतम शुगर ट्रेडिंग कंपनी, शाहूपुरी, कोल्हापूर यांची वारणा सहकारी साखर कारखान्यात सोमवारी (४ मार्च) ट्रक (एमएच ५० एन ४७३३) मध्ये ३० टन वजनाची ६०० साखरेची पोती लोड केली. त्याची किंमत सुमारे १०, ८९, ९००/- रुपये आहे. ही साखर ब्रिटानिया इंडस्ट्रीज कंपनीस द्यावयाची होती. मात्र साखर कंपनीला पोहोचलीच नसल्याचे काही दिवसांनी निदर्शनास आले. त्यानंतर फिर्याद दाखल करण्यात आली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »