साखर आयुक्त कार्यालयावर ७ ला इशारा मोर्चा
पुणे : साखर उद्योग क्षेत्रातील कामगारांच्या विविध मागण्यांसाठी येत्या ७ ऑगस्ट रोजी पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात येणार आहे.
29 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीमध्ये दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी साखर आयुक्त कार्यालयावर राज्यातील साखर कामगारांच्या पगार वाढीसाठी /प्रलंबित मागण्यासाठी इशारा मोर्चा काढण्याचे निश्चित झाले. याबाबतचे नोटीस / पत्र साखर आयुक्तांना देण्यात आले आहे.
साखर आयुक्तांना महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकरराव भोसले, कार्याध्यक्ष रावसाहेब पाटील, खजिनदार प्रदीप बनगे, सचिव राजेंद्र तावरे, संजय मोरबाळे त्याचबरोबर बारामती तालुका साखर कामगार सभेचे पदाधिकारी व माळेगाव कारखान्याचे माजी कामगार संचालक प्रमोद खलाटे, माजी कामगार संचालक रणसिंग आटोळे आदींची बैठक होऊन मोर्चाचे पत्र साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांना देण्यात आले..